शिंदे गटात जाणार...? राजन साळवी म्हणाले, ‘मला खोक्याची गरज...’

कोकणातील राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहेत, अशी चर्चा गुरुवारपासून सुरू आहे.
Rajan Salvi
Rajan Salvi Sarkarnama

मुंबई : कोकणातील (Konkan) राजापूरचे शिवसेनेचे (shivsena) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटात सामील होणार आहेत, अशी चर्चा गुरुवारपासून (ता. १८ ऑगस्ट) राज्यात सुरू आहे. त्याबाबत ट्विट करत आमदार साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Clarification of MLA Rajan Salvi about joining Eknath Shinde group)

Rajan Salvi
दिलीप सोपलांची ईडी चौकशी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही : राजेंद्र राऊतांचा इशारा

आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचे आमदार साळवी यांनी म्हटले आहे की, ‘आमची निष्ठा कायम मातोश्री चरणी... काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त... हे ट्विट त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला टॅग केले आहे. सोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटोही जोडले आहेत.

त्यानंतर साळवी यांनी दुसरे एक ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी ‘निष्ठेचे प्रमाणपत्र १५ ऑक्टोबर २००२ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले आहे. मला खोक्याची गरज नाही... असे आमदार राजन साळवी यांनी पक्षांतराच्या वृत्ताला सोशल मीडियातून उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटाला जाऊन मिळणार अशी चर्चा कालपासून राज्यात सुरू झाली आहे. तो कोकणातील तो आमदार कोण याची उत्सुकता असतानाच आमदार राजन साळवी यांचे नाव पुढे आले होते. आता खुद्द आमदार साळवी यांनीच पुढे येत या सर्व गोष्टींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Rajan Salvi
इकडं ईडी, इन्कम टॅक्स आहे...त्यांचेच काही दोस्त जेलमध्ये जाऊन बसले आहेत’

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने आमदार राजन साळवी यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी साळवी यांनी ती निवडणूक नेटाने लढवली होती. तसेच, ते कट्टर ठाकरेनिष्ठ असल्याने त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता त्यांनीच या सर्व गोष्टींवर पडदा टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com