राणे, ठाकरे शेजारी बसले पण एकमेकांकडे बघितलं नाही अन् बोललेही नाहीत!
Narayan Rane, Uddhav Thackeraysarkarnama

राणे, ठाकरे शेजारी बसले पण एकमेकांकडे बघितलं नाही अन् बोललेही नाहीत!

हा योग पुन्हा कधी येईल का?

मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अनेक दिवसानंतर उद्घाटनाच्या नियमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारयण राणे हे एकाच व्यासपीठावर आले. मात्र, त्या दोघांनी ना एकमेकांकडे पाहिले, ना बोलले. हे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Narayan Rane, Uddhav Thackeray
काही तासातच राणे बॅकफूटवर : म्हणाले कोणतेही राजकारण करणार नाही

दरम्यान, शिवसेना नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. मात्र, काही तासातच राणे बॅकफूटवर गेले आहेत. विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतेही राजकारण करणार नाही. या कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्या आमच्याकडून होणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले होते.

कोणतेही राजकारण करणार नाही. राजकारण केले जाणार नाही. कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकाच व्यासपिठावर येत आहात, असे विचारले असता राणे म्हणाले होते, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला आहे. हा योग पुन्हा कधी येईल का? असे विचारले असता राणे म्हणाले, ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असे राणे म्हणाले होते.

Narayan Rane, Uddhav Thackeray
'त्या' तिघांना भाजप नेत्यांच्या फोनवरुन सोडण्यात आलं ? मलिक यांचा एनसीबीवर 'बॉम्ब'

विमानतळाचे उद्घाटनासाठी ज्योतिरादित्य शिंदे, उद्धव ठाकरे, नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत.

Related Stories

No stories found.