Eknath Shinde News : सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, सहनशीलतेचा अंत पाहू नका; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा

Uddhav Thackeray News : खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
Eknath Shinde News
Eknath Shinde News Sarkarnama

Eknath Shinde News : माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, सांगण्यासाखे बरेच काही आहे, सहन करण्याची देखील एक मर्यादा आहे, आमच्या सहन शिलतेचा अंत पाहू नका, असा इशारा यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाव न घेता दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी चौफेर टीका केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), आणि उद्धव ठाकरे यांचा शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. या सभेत बोलताना शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला मुख्यमंत्री केले. मला म्हणतात दिल्लीला चकरा मारणारा मुख्यमंत्री आहे, हो मी फिरणाराच मुख्यमंत्री आहे, मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Eknath Shinde News
Eknath Shinde | कोकणी माणूस धनुष्यबाणासोबत : ठाकरेंची सभा म्हणजे आपटीबार ; शिंदेचा हल्लाबोल!

दिल्लीला गेलो पण तेथून राज्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. बदल घडवणे आणि लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणने हेच माझे काम आहे. आता थोडे जास्त काम करावे लागते. मी अधिकाऱ्यांना रात्रीचे सुद्धा फोन करतो. राज्यसरकारच्या माध्यमातून नऊ महिन्यात अनेक निर्णय घेतले. या निर्णयांची लिस्ट मोठी आहे, वाचायला गेले तर १ तास लागले. शेतकऱ्यांना २ हजार रुपये अनुदान, महिलांना एसटीबस भाड्यात ५० टक्के सवलत. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. जो पंचामृत अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सगळ्यांना काहीना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या अर्थसंकल्पाला गाजराचा हलवा, अशी टीका केली. मात्र, आम्ही गाजरांचा हलवा का असेना पण दिला. तुम्ही तर नुसतीच गाजर दाखवली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

तुम्ही बाळासाहेबांवर प्रेम केले आहे. मी कोकणाला भरभरून देण्यासाठी आलो आहे. योगेश कदम यांनी मागणी केली, ती पूर्ण केली आहे. त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल. कोकणातील अनेक प्रकल्प मार्गी लावणार आहे. सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करणार आहे. हे सरकार पैसे कमी पडू देणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला.

कोकणामध्ये सगळ आहे, क्रिडा संकूल तयार करणार आहे, कुणबी भवन आणि अनेक स्मारकांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली. कोकणातील उद्योगांसाठी मोठा निधी दिला आहे. चार वर्षासाठी १३ कोटी निधी दिला आहे. कोकणात अनेक प्रकल्प होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्ष रखडला होता. त्याचे काम मे पर्यंत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गा प्रमाणे कोकणातही महामार्ग तयार करणार आहे. कोकणातील तरुणांना येथेच काम मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. हे सरकार देणार आहे, घेणारे नाही, असेही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde News
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंच्या सभेत लावरे 'तो' व्हिडीओ; उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ अन्...

माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. त्या वेळी मला डॉक्टरांचा फोन आला. मी राजेंद्र गावीत यांच्या प्रचारसभेसाठी निघालो होते. मी गावीत यांना सांगितले. मात्र, ते म्हणाले, मी सभेची तयारी केली आहे. मी त्यांच्या सभेला गेलो, त्यानंतर रुग्णालयात गेलो. तेव्हा आई गेलेली होती, असे काम केले. कोरोनात रात्रण-दिवस काम केले, हा आमचा गुन्हा आहे का? असा सवाल शिंदे यांनी केला. आम्हाला गद्दार म्हणता, असे शिंदे म्हणाले. कोकणाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. तसेच योगेश कदम ऐवढे काम करेल की पुढच्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com