बुलेट ट्रेन म्हणजे आमच्या मुंबईला लुटून नेण्याचा डाव : नाना पटोले

पालघर जिल्ह्यात Palghar District काँग्रेस पक्ष कमजोर नाही. आपल्या उमेद्वारांचाच विजय निश्चित आहे.
Nana Patole Meeting at virar
Nana Patole Meeting at virarSarkarnama

विरार ः बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला लुटून नेण्याचा डाव भाजपने आखला आहे. याठिकाणी भाजपमुळेच पंचायत समिती निवडणूक पुन्हा लादली गेली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज तिल्हेर येथील सभेमध्ये केली.

पालघर जिल्ह्यातील वसई तालुका पंचायत समिती निवडणुकीत तिल्हेर गणातून काँग्रेस उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या निकिता निलेश पाटील यांच्या प्रचारसभेच्या वेळी ते बोलत होते. यावेळी हुसेन दलवाई, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, विजय पाटील ,यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते नेते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पटोले यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला, आरक्षण संपवणारा, महागाई वाढवणारा व फक्त मित्रांनाच खाजगिकरणातून पोर्ट, एअर पोर्ट देणाऱ्या भाजपला फक्त काँग्रेस हा एकमेव पक्ष भाजपाला आव्हान ठरू शकतो. पालघर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कमजोर नाही. आपल्या उमेद्वारांचाच विजय निश्चित आहे. भाजपला या जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले.

Nana Patole Meeting at virar
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले

यादरम्यान वीज प्रवाह खंडित झाला. त्यावर हीसुद्धा विरोधकांची चाल असू शकते, असे सांगत त्यांनी पुढील भाष्य त्यांनी चालू ठेवले होते. तर सुरवातीला विजय पाटील यांनी वसई भागातील भूमिपुत्र, शेती, उद्योग यांमध्ये येणाऱ्या अडीअडचणी मांडल्या. नाना पटोले यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावर भरपूर प्रहार केले. येत्या निवडणुकांमध्ये जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. कारण या लोकांनी केवळ आणि केवळ देशाला लुटण्याचे धंदे सुरू केले आहेत, असा प्रहार नाना पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in