मोठी बातमी : शिवसेनेला भाजपचा पाठिंबा; शिंदे गटाच्या सामंतांविरोधात एकत्र!

रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी ग्रामपंचायतीमध्ये वेगळीच राजकीय गणिते निर्माण झाली आहेत.
shivsena-bjp
shivsena-bjpSarkarnama

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील चाफेरी ग्रामपंचायतीमध्ये (Grampanchyat) वेगळीच राजकीय गणिते निर्माण झाली आहेत. गाव विकास पॅनेलच्या माध्यमातून एक पॅनेल शिंदे गट पुरस्कृत म्हणजे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे आहे, तर दुसरे पॅनेल ठाकरे सेनेचे (Shivsena) आहे. त्याला भाजपचा (BJP) बाहेरून पाठिंबा आहे. सामंत गटाचे दोन सदस्य बिनविरोध झाले असले तरी साडेसहाशे एवढेच मतदान असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. (BJP's support to Shiv Sena; United against Uday Samant of the Shinde group!)

चाफेरी ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य असून थेट सरपंच निवडणूक होणार आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत गावात दर्जेदार रस्ते, पाखाड्या, स्ट्रीटलाईट, सुसज्ज शाळा उभारण्यात आली आहे. पाच वर्षात झालेला विकास हाच आमच्या प्रचाराचा अजेंडा असून केवळ विकासकामांच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. विकासकामांच्या जोरावर जनता आम्हालाच मतदान करेल, असा दावा आदित्येश्वर गाव विकास पॅनेलने केला आहे.

shivsena-bjp
Shinde Group-Bjp : भाजपच्या डावपेचामुळे मुख्यमंत्री ‘बॅकफूट’वर : अधिवेशनाच्या तोंडावर शिंदेंची कोंडी

आदित्यश्वर गाव पॅनेलचे नेतृत्व बाबू पाटील करीत असून येथे वेगळी युती पुढे आली आहे. राज्यात ठाकरे आणि भाजप विरोधात असली तरी चाफेरी ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपने पाठिंबा दिल्याचे समजते, त्यामुळे या पॅनेलची चांगलीच ताकद निर्माण झाली आहे.

shivsena-bjp
Ajit Pawar : अजितदादांनी शरद पवारांसमोरच घेतली राष्ट्रवादीच्या नेत्याची हजेरी; म्हणाले, ‘कुणाची बिनपाण्यानं करायची असं..’

अनेक वर्षांपासून चाफेरी गावासाठी काम करणारे नंदू केदारी आणि विवेक सुर्वे हे दुसऱ्या गाव विकास पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहेत. विवेक सुर्वे हे भाजपचे समर्थक आहेत. मात्र यावेळी विवेक सुर्वे यांनी नंदू केदारीच्या सहकार्याने पॅनेल तयार केले असून पॅनेलने सामंत समर्थकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. केदारी यांच्या पॅनेलमधील सातपैकी २ सदस्य बिनविरोध झाले आहेत. आता पाच सदस्यांच्या निवडीसाठी दोन्ही पॅनेलमध्ये जोरदार चुरस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in