Rajan Teli

Rajan Teli

Sarkarnama

आमच्या नेत्यांना केसेसमध्ये अडकवले नसते, तर आम्ही १५ जागा जिंकल्या असत्या : राजन तेली

वरिष्ठ नेतेमंडळींशी बोलणे झाल्यानुसार मी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Sindhudurg district bank election) पराभूत झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (bjp) जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पुढे येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी आमच्या नेत्यांना केसेसमध्ये अडकवले, अन्यथा आम्ही १९ पैकी १५ जागा जिंकल्या असत्या,’ असा दावाही तेली यांनी केला. (BJP's Sindhudurg district president Rajan Teli said on the defeat in the district bank ...)

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत पॅनेलने वर्चस्व मिळविले. पण, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला, त्यामुळे भाजपचा अवस्था गड आला पण सिंह गेला, अशी झाली. त्या पराभवानंतर तेली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्याबाबतही तेली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Rajan Teli

शरद पवारांच्या दौऱ्यामुळे अशोक पवारांच्या जिल्हा बॅंकेच्या मार्गातील अडथळे दूर!

तेली म्हणाले की, शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी आमच्या नेत्यांना केसेसमध्ये अडकवले; तरीही आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील सत्ता खेचून आणली आहे. भाजपचे नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर 2008 पासून भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. मात्र, यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती, त्यामुळे भाजप नेते नारायण राणे, रवींद्र चव्हाण, नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले यामुळेच पुन्हा जिल्हा बँकेवर आम्ही सत्ता खेचून आणू शकलो.

Rajan Teli

इथून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता, राजनची वर्णी कुठेही लावू! राणेंनी दिला जाहीर शब्द

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्ह्यात दाखल होऊन सर्व ताकद लावली होती. पोलिस प्रशासनाने दडपशाही दाखवली, तरीही आमचाच विजय झाला आहे. आमच्या नेतेमंडळींना नाहक केसेसमध्ये अडकविले; नाहीतर जिल्हा बँकेच्या 19 जागांपैकी किमान 15 जागा आम्ही जिंकल्या असत्या. तरीही 11 जागा जिंकून आमची सत्ता आली आहे, याचे समाधान आहे, असे तेली यांनी नमूद केले.

Rajan Teli

जिल्हा बँकेतील विजयावर नारायण राणे म्हणाले, हा तर अकलीने मिळवलेला विजय!

भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत तेली म्हणाले की, वरिष्ठ नेतेमंडळींशी बोलणे झाल्यानुसार मी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. हा राजीनामा वैयक्तिक कारणासाठी देत असून यापुढे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com