राणेंचाच आव्वाज! जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला दे धक्का

भाजपच्या (BJP) सिद्धिविनायक पॅनेलचे आतापर्यंत 10 उमेदवार निवडून आले आहेत.
Narayan Rane Latest Political News in Marathi

Narayan Rane Latest Political News in Marathi

sarkarnama

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा (Sindhudurg District Bank Election) बँक निवडणुकीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या (BJP) सिद्धिविनायक पॅनेलचे आतापर्यंत 10 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 6 जागा मिळाल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांची प्रतिष्ठ पणाला लागली होती. नारायण राणे विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याच निवडणूक झाली. शिवसेनेचे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपचेही अनेक नेते पराभूत झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतिश सावंत (Satish Savant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत.

<div class="paragraphs"><p>Narayan Rane Latest Political News in Marathi</p></div>
वैभव नाईक पुन्हा जायंट किलर : नारायण राणेंचे कट्टर राजन तेली पराभूत

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत. वैभव यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बॅंक नसल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या आधी ते दोनदा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रीक केल्याचे आज स्पष्ट झाले.(Narayan Rane Latest Political News in Marathi)

<div class="paragraphs"><p>Narayan Rane Latest Political News in Marathi</p></div>
मोठी बातमी : महाविकास आघाडीला धक्का; सतीश सावंत पराभूत

सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच नितेश राणे अडचणीत आले होते. त्यामुळे सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com