भाजप-सेना कार्यकर्ते आमने-सामने; थेट पोलिस अधिक्षकांना करावा लागला हस्तक्षेप

मतदानावेळी केंद्रावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यात बाचाबाची झाली.
 BJP & ShivSena

BJP & ShivSena

Sarkarnama

कणकवली : जिल्हा बँकेसाठी (District Bank Election) तालुक्यात १६५ पैकी १६१ इतके मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोठ्या सावंत यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर आणि आजारी असलेले सुरेश सावंत असे चार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर कोण बाजी मारणार याची प्रतीक्षा लागली आहे. मतदानावेळी केंद्रावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यात बाचाबाची झाली. मतदानानंतर शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी फटाके लावून घोषणाबाजी केल्याने भाजप (BJP) शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने घोषणा बाजी देत होते. मात्र, काही वेळेतच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे (SP Rajendra Dabhade) घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना बुथावरून पांगवण्यात आले. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत झाली.

<div class="paragraphs"><p> BJP &amp; ShivSena </p></div>
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामांचे कधीही समर्थन करत नाही...

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी आज (ता.30 डिसेंबर) मतदान झाले. कणकवली हे संघर्षाचे केंद्र बनले होते. त्यामुळे कणकवलीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या मतदारसंघातील विकास संस्थेमधून विद्यमान बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत विरुद्ध संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई अशी लढत आहे. यासाठी एकूण ३६ मतदार होते. मात्र, तळेरे संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. ते आज मतदान केंद्रावर पोचू शकले नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात केवळ ३५ इतकेच मतदान झाले. मजूर सहकारी संस्थेचे संदेश सावंत तसेच, एका मंडळाचे मतही त्यांच्याकडे होते. याचबरोबर शिक्षण संस्थेचे मतदार असलेल्या सुरेश शांताराम सावंत हे आजारी असल्याने मुंबईतून मतदानासाठी पोचू शकलेले नाहीत. त्यामुळे ४ मते वगळता १६१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

<div class="paragraphs"><p> BJP &amp; ShivSena </p></div>
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपला झटका : स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काँग्रेसची बाजी

आज सकाळी येथे मतदानाला सुरूवात झाली. आमदार वैभव नाईक, बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली, जि.प. अध्यक्षा संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, निलम नारायण राणे अशा दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. हल्ला झालेले संतोष परब यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रा बाहेर महाविकास आघाडी आणि भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांनी सकाळ पासून गर्दी केली होती. शिवसेनेच्या १५ ते २० मतदारांनी एकत्र येत मतदान केले. भाजपकडून मात्र काही मतदार हे वेगवेगळे येत होते.

दरम्‍यान, जिल्‍हा बँक निवडणुकीत चांगले मतदान झाले असून मतदारांचा उत्‍साह प्रचंड होता. वातावरणही चांगल होतं. त्‍यामुळे सर्वच्या सर्व १९ जागा जिंकू, असा विश्‍वास असल्‍याचे सतीश सावंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com