१०५ वर्षांनंतर निवडणूक लागली आणि भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले!

विरोधी सर्वपक्षीय सहकार पॅनेलला खातेही उघडता आले नाही.
Talere Society elections

Talere Society elections

sarkarnama

तळेरे (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यातील तळेरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या १०५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (bjp) पुरस्कृत परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. विरोधी सर्वपक्षीय सहकार पॅनेलला खातेही उघडता आले नाही. (BJP panel wins Talere Society elections)

तळेरे सोसायटी निवडणुकीत महिलांसाठी असलेल्या २ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित ११ जागांसाठी भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनेल विरुद्ध सर्व पक्षांचे मिळून पक्षविरहित सहकार पॅनेल यांच्यात लढत झाली. निवडणूक निकाल असा ः सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी विजयी ८ उमेदवार ः १) दिलीप चिमाजी तळेकर- २७० मते, २) अनिल गणपत मेस्त्री -२६२ मते, ३) सुधाकर मधुकर राणे- २५८ मते, ४) अशोक शांताराम तळेकर-२४९ मते, ५) प्रमोद नारायण तळेकर-२४८, ६) अनंत उमाजी राणे-२४४ मते, ७) प्रदिप जनार्दन तळेकर-२४२ मते सर्व विजयी उमेदवार (भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनल), ८) निलेश अरविंद तळेकर- (अपक्ष) -१३५ मते विजयी उमेदवार.

Talere Society elections

शिवसेनेत वाद पेटला : माजी नगराध्यक्षाने सर्वांसमक्ष फाडला अर्ज; शहरप्रमुखाची बंडखोरी!

अनुसूचि जाती जमाती प्रतिनिधी : दिनेश भिवा कांबळे (परिवर्तन पॅनेल विजयी)-२६४ मते. भटक्या विमुक्त/ जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग:- बिरु खंडू पटकारे (परिवर्तन पॅनेल)-२६३ मते विजयी. इतर मागास वर्ग प्रतिनिधी- विजय सुरेश मेस्त्री (परिवर्तन पॅनेल)-२६५ मते- विजयी. महिलांसाठी राखीव मतदारसंघ - बिनविरोध निवडून दिलेले उमेदवार- श्रीमती सुषमा विजय बांदिवडेकर (तळेरे खंडवाडी) व श्रीमती रंजना राजाराम गुरव (गुरववाडी साळिस्ते दोन्हीही परिवर्तन पॅनेल)

Talere Society elections

निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर दरेकरांनी घेतले फडणवीसांचे आशीर्वाद अन्‌ म्हणाले...

दरम्यान, विजयश्री खेचून आणण्यासाठी पॅनेलची रणनीतीकार राजेश जाधव, उल्हास कल्याणकर, राजेश माळवदे, दिपक नांदलस्कर, मनोज तळेकर, किशोर खाडये, तसेच शैलेश सूर्वे, सुयोग तळेकर, चिन्मय तळेकर, बली तळेकर, अनुप तळेकर, सिद्धेश तळेकर, अभिष्ट नांदलस्कर, रोहित तळेकर, अमेय खटावकर, तेजस तळेकर यांच्यासह साळिस्ते, दारुम, ओझरम व तळेरे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

Talere Society elections

शंभूराज देसाईंनी निष्ठावंत कार्यकर्त्याला दिली नववर्षाची अनोखी भेट!

तळेकरांच्या रणनीतीची चर्चा!

रविवारी (ता.२ जानेवारी) झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत भाजप पुरस्कृत परिवर्तन १० उमेदवार व परिवर्तन पॅनेल पुरस्कृत पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले निलेश तळेकर निवडून आले. असे १३ ही उमेदवार एक हाती निवडून आणण्याचा चमत्कार पॅनेल प्रमुख व कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी केला आहे. मतमोजणीनंतर तळेकर यांच्या रणनीतीची चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in