Nitesh Rane Vs Sanjay Raut: राऊतांबाबतची 'ती' माहिती मिळवण्यासाठी नितेश राणे लिहिणार थेट 'WHO'ला पत्र!

Rane Vs Raut : ''...अशी जीभ पुन्हा होणे नाही!''
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama

Sindhudurg : राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे सातत्यानं राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत असतात. अखेर भाजपकडून राऊतांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याची जबाबदारी ही आमदार नितेश राणे यांच्यावर सोपवली आहे. यानंतर राऊत आणि राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झडू लागल्या आहेत. याचदरम्यान, आता नितेश राणे हे जागतिक आरोग्य संघटने(WHO)ला पत्र लिहिणार आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. राणे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटने(WHO)ला मी एक पत्र पाठवणार आहे. त्यात संजय राऊतच्या जिभेचे संशोधन करावं अशी विनंती करणार आहे. एखादी व्यक्ती 24 तास कशी चाटुगिरी करू शकते याचा अभ्यास करावा असं त्यांना सुचवणार आहे अशा शब्दांत खोचक टोला लगावला आहे.

Nitesh Rane, Sanjay Raut
Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे आणि कल्याण सोडणार शिवसेनेला; पक्षाच्या बैठकीनंतर संकेत

...हे राऊतांना कळतंय का?

राणे म्हणाले, संजय राऊत(Sanjay Raut) आज म्हणाले, राहुल गांधी हे सचिन तेंडुलकर, विराट कोहली आहेत. त्यांना सांगेन की, या दोन्ही क्रिकेटपटूंनी जगात भारताची मान उंचावली आहे. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आमच्या देशाची, हिंदू धर्माची बदनामी करत आहेत. हे संजय राऊतला कळतंय का?, असा संतप्त सवालही राणे यांनी विचारला आहे.

आपल्या राष्ट्रगीताबद्दल मोदीजी गेल्यानंतर एक वेगळा अभिमान ऐकायला मिळतो. काल राहुल गांधींच्या कार्यक्रमात आपलं राष्ट्रगीत सुरू असताना लोक उठून सुद्धा उभे राहिले नाहीत. राहुल गांधींच्या मोहोब्बतच्या दुकानात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. हिरवे झेंडे फडकवले जातात. यालाच राहुल गांधींची मोहोब्बत म्हणायची का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

Nitesh Rane, Sanjay Raut
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना भाजपात कोणी विचारत नाही ; त्यांनी आता निर्णय घ्यावा ; राऊतांचे सूचक..

नितेश राणे (Nitesh Rane)यांनी यावेळी राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणावरुन खळबळजनक दावा केला आहे. यात ते म्हणाले, भारतात हिंदूंचे मतदान हवं असतं, तेव्हा हिंदू मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घालत असतात. भारताच्या बाहेर जाऊन हिंदू धर्माची, देशाची बदनामी करतात. त्याला संजय राऊत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर म्हणणार का? ज्या राहुल गांधींचे गोडवे गाताय, चाटुगिरी करताय. त्यांच्या सभेत किती आयएसआयचे लोक होते, याची माहिती राऊतांनी घ्यावी असा घणाघातही राणे यांनी केला आहे.

आता किर्तीकरांची आठवण येते,आता खडसेसाहेबांची आठवण येते? तुझा मालक मुख्यमंत्री असताना शिवसेना उभी करणाऱ्या शिवसैनिकांची आठवण केली होती का? 40 आमदार आणि 13 खासदार सोबत असताना त्यांची काळजी घेतली असती तर ही वेळ आली नसती असंही राणे यावेळी म्हणाले.

Nitesh Rane, Sanjay Raut
Solapur Politics : अजितदादा,जयंत पाटलांच्या दौऱ्याआधीच मुख्यमंत्री शिंदेंनी टायमिंग साधलं; राष्ट्रवादीच्या...

''...तर त्यांच्यासारखा दुसरा गद्दार नाही!''

सगळे देशभक्त 12 जूनला एकत्र येणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. पण जर सगळे राष्ट्रद्रोही, सगळे गद्दार,पाकिस्तान समर्थक 12 जूनला एकत्र येत असतील आणि त्यांना संजय राऊत आणि मालक राष्ट्रभक्त म्हणत असेल तर त्यांच्यासारखा गद्दार दुसरा नाही असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.

संजय राऊतांचा खळबळजनक दावा....

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पार्टीच्या कार्यक्रमात संबोधित करताना भाजप माझा पक्ष आहे. पण मी भाजपची थोडीच आहे, असं विधान केलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत. पण भाजप त्यांना आपलं मानत नाही. असं त्यांना म्हणायचं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं.

भाजपला आजचे दिवस गोपीनाथ मुंडे यांनी दाखवले. त्यांच्यासोबत बहुजन समाजातील नेते होते. बहुजन समाजातील या नेत्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला. शिवसेनेशी युती केली, हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे कुटुंबाचं अस्तित्व राजकारणात राहू नये यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com