नितेश राणे तुरूंगात पुस्तक वाचण्यात दंग? फोटो व्हायरल

फोटोमध्ये तुरुंगातील कोठडीचे लोखंडी गज आणि त्यापलीकडे पुस्तक वाचत बसलेले नितेश राणे (Nitesh Rane) स्पष्टपणे दिसत आहेत.
Nitesh Rane reading book in jail
Nitesh Rane reading book in jailsarkarnama

मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी आमदार नितेश राणे अखेर बुधवारी न्यायालयासमोर शरण झाले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

समाज माध्यमांवर सध्या नितेश राणे यांना तुरुंगात बसून पुस्तक वाचण्यात दंग असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुरुंगातील कोठडीचे लोखंडी गज आणि त्यापलीकडे पुस्तक वाचत बसलेले नितेश राणे (Nitesh Rane) स्पष्टपणे दिसत आहेत. महिन्याभराच्या अज्ञातवासानंतर काल पोलिस कोठडी सुनावलेलं नितेश राणे हे निवांतपणे पुस्तक वाचत असल्याचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या, पण काही तासातच या फोटो खरा की खोटा यामागील खुलासा झाला. (Nitesh Rane Viral Photos from Jail)

पुस्तक वाचत असतानाचा नितेश राणेंचा हा फोटो बुधवारचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फोटो पाच वर्षापूर्वीचा आहे. वाळूच्या प्रश्नावरुन पाच वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करुन राडा केला होता. त्यावेळी नितश राणे यांना अटक झाली होती. तेव्हाचे नितेश राणे यांचे हे छायाचित्र आहे.

Nitesh Rane reading book in jail
किरण माने उद्या कुणाची गुपितं उलगडणार ? म्हणाले, ''जिंकेन नायतर मरेन''

संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे हे सध्या दोन दिवस पोलीस कोठडीत आहेत. नितेश राणे यांनी बुधवारी संध्याकाळी कणकवली दिवाणी न्यायालयासमोर शरणागती पत्कारली होती. यानंतर न्यायालयात राणेंच्या पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद झाला. पोलिसांनी नितेश राणे यांची १० दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने नितेश राणे यांना केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

'न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत आहे,' असं आमदार नितेश राणे यांनी न्यायालयासमोर हजर होण्यापूर्वी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com