सिंधुदुर्गमधील भाजपच्या निष्ठावंत राणेंचा शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराज होत राणे यांनी पक्षाला रामराम केला आहे. तसेच, शेर्ले-पिंगुळकरवाडी येथील युवकांनीही शिवबंधन हाती बांधले आहे.
Bjp Activist Join Shivsena
Bjp Activist Join ShivsenaSarkarnama

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : इन्सुली पंचक्रोशीत चांगला जनसंपर्क असणारे भारतीय जनता पक्षाचे (bjp) निष्ठावान कार्यकर्ता अशी ओळख असणारे संजय राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराज होत राणे यांनी पक्षाला रामराम केला आहे. तसेच, शेर्ले-पिंगुळकरवाडी येथील युवकांनीही शिवबंधन हाती बांधले आहे. आमदार केसरकर यांनी त्यांचे स्वागत करून विकास कामांसाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन सेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना दिले. (BJP loyalists from Sindhudurg join Shiv Sena)

संजय राणे, प्रवीण राणे, अनिल पिंगूळकर, जितेश पिंगुळकर, महेश पिंगूळकर, स्वप्नील पिंगूळकर, गणपत पिंगूळकर, विशाल पिंगूळकर, सागर पिंगूळकर, सचिन पिंगूळकर, सीताराम पिंगूळकर, कृष्णा पिंगूळकर आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार दीपक केसरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

Bjp Activist Join Shivsena
मोदींची सभा झाली तर श्रीकांत देशमुखही आमदार होतील : शहाजी पाटलांची गुगली!

शिवसेनेत प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जात असून सर्वसामान्याची कामे आमच्यापर्यंत पोचवा. विकास कामासाठी निधी देण्याचे आश्वासन या वेळी आमदार केसरकर यांनी दिले. इन्सुली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक भागू पाटील यांचे आमदार केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

Bjp Activist Join Shivsena
कात्रज डेअरी : केशरताई पवार ठरल्या पहिल्या महिला अध्यक्षा; राहुल दिवेकर उपाध्यक्ष

या वेळी माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे, माजी सभापती अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच काका चराटकर, माजी उपसरपंच नाना पेडणेकर, कृष्णा सावंत, विभाग प्रमुख फिलिप्स रॉड्रीग्स, उपविभाग प्रमुख मंथन गवस, राजन परब, माजी सरपंच विजय डुगल, अमित कानसे, आपा आमडोसकर, मंगेश राणे आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com