लखीमपूर खिरी घटनेवर भाजपच्या मोठ्या नेत्याचे प्रथमच भाष्य...

यात राजकीय वास येतो आहे.
लखीमपूर खिरी घटनेवर भाजपच्या मोठ्या नेत्याचे प्रथमच भाष्य...
Devendra FadnavisSarkarnama

भाईंदर : लखीमपूर खिरी घटनेवर खेद व्यक्त करत असतानाच राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे अधिक लक्ष दिले असते. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे जो शेतकरी आक्रोश करत आहे, त्याचा विचार केला असता तर हे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी आहे असे म्हणता आले असते. पण, त्यासंदर्भात कोणताही ठोस विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव संमत करणे म्हणजे केवळ संधीसाधूपणा आहे आणि यात राजकीय वास येतो, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर उत्तन येथे बोलताना केला. (BJP leader Devendra Fadnavis's comment on Lakhimpur Khiri incident ...)

उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या पं. दीनदयाळ दर्शन प्रकल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी भय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेबद्दल राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत खेद व्यक्त केला. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी मदत मिळाली नाही, तर भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला

Devendra Fadnavis
झेडपी अध्यक्षांनी सही करण्यापूर्वी फाईल अजित तळेकरांकडे जाते

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून सत्ताधारी शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेची ताकद कमी झाली आहे, हे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis
अजित पवारांचा कारखाना चालविणारे वीरधवल जगदाळे प्राप्तीकर छाप्यानंतर म्हणाले...

ते म्हणाले की, या निवडणुकीत मतदारांनी भाजपवर सर्वांत जास्त विश्वास दाखवल्यामुळे भाजपने एकूण जागांच्या २५ टक्के जागा जिंकल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत; तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे उरलेल्या ५० टक्क्यांमध्ये राहिले आहेत. यावरून भाजपने राज्यात स्वत:ची व्याप्ती वाढवली आहे आणि ती वाढवतच जाणार आहे; तर शिवसेनेची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी कमी करत आहे आणि याचा विचार त्यांनी करायचा आहे.

Related Stories

No stories found.