Mahrashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला आयात करावा लागला उमेदवार; आघाडीचे तगडे आव्हान

Politics : कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात शिक्षकांच्या मतदार नोंदणीकडे भाजपचे दुर्लक्ष?
Dnyaneshwar Mhatre
Dnyaneshwar Mhatre Sarkarnama

Mahrashtra Politics : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार हालचाली करत आहे. तर कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी भाजपवर उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे.

भाजपने कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपवर उमेदवार आयात करण्याची वेळ का आली? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. या मतदारसंघावर भाजप आणि संघप्रणीत शिक्षक परिषदेचे वर्चस्व होते.

Dnyaneshwar Mhatre
Raj Thackeray : अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे थेट फडणवीसांच्या बंगल्यावर : चर्चांना एकच उधाण!

मात्र, गेल्या निवडणुकीत बाळाराम पाटील यांचा विजय झाला. मात्र त्यानंतर भाजपने या मतदारसंघाच्या बांधणीकडे दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जाते. मात्र गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले बदलापूरचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतदारसंघात बांधणी केली.

शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क तगडा केला. तर दुसरीकडे निश्चित धोरण नसल्याने शिक्षकांच्या मतदार नोंदणीकडे भाजपचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारच नसल्याची चर्चा रंगली होती.

Dnyaneshwar Mhatre
Mahrashtra Politics : नाशिक पदवीधरमध्ये येणार नवीन ट्विस्ट; 'अनपेक्षित उमेदवार असू शकतो'

याच पार्श्वभूमीवर भाजपने बैठक घेत रवींद्र चव्हाण यांना या निवडणुकीची जबाबदारी दिली. त्यांचा कल शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेचे कोकण विभागीय अध्यक्ष असलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्याकडे होता. त्यामुळे ऐनवेळी पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन पराभव स्वीकारण्यापेक्षा म्हात्रे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सोमवारी ज्ञानेश्वर म्हात्रे हे भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समन्वयातून हा उमेदवार दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com