राजापुरात शिवसेनेचा भाजपला दे धक्का!

शिवसेनेने आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
राजापुरात शिवसेनेचा भाजपला दे धक्का!
ShivsenaSarkarnama

राजापूर : राजापूर भारतीय जनता पक्षाचे एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. त्यांच्या हातामध्ये शिवबंधन बांधत आमदार डॉ. राजन साळवी यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आहे. या वर्षअखेरीला येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका रंगणार असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीमध्ये चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून शिवसेनेने आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. (BJP corporator Govind Chavan joins Shiv Sena)

शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार राजन साळवी यांच्यासह तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, पंचायत समिती सभापती करुणा कदम, संतोष हातणकर, शहर संघटक जितेंद्र मालपेकर, महिला शहर आघाडी वीणा विचारे, युवा सेनेचे शहर अधिकारी प्रज्योत खडपे, नगर पालिकेतील शिवसेना गटनेता विनय गुरव, नगरसेवक अनिल कुडाळी, सौरभ खडपे, नगरसेविका शुभांगी सोलगावकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, कार्यालय प्रमुख मधु बाणे आदी उपस्थित होते.

Shivsena
अजित पवार म्हणाले होते, ‘मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे...अन्‌ सभासदांनी ते खरे करून दाखवले!

या वर्षअखेरीला होणाऱ्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे ढोल आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चोबांधणीला सुरूवात केली आहे. त्याच्यातून आज भाजपचे नगरसेवक चव्हाण यांनी आमदार डॉ. साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या समवेत निनाद शिर्सेकर, नेहा चव्हाण, संपदा वाघरे, जयश्री म्हादये, स्मिता चिंबुलकर, वैशाली पावसकर, मृण्मयी चव्हाण, संजय मोहीते, साईराज चव्हाण, चैतन्य शेट्ये, तन्मय शिवलकर, समीर नावेलकर आदींचा समावेश होता.

Shivsena
भाजप बदलणार ZP अध्यक्ष : काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलण्याची या नेत्यांवर जबाबदारी!

सत्ताधाऱ्यांशी मतभेद अन्‌ पक्षांतराचा निर्णय

सतरा नगरसेवक संख्या असलेल्या राजापूर नगर पालिकेमध्ये गोविंद चव्हाण हे भाजपचे एकमेव नगरसेवक होते. गेली चार वर्ष ते सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत होते. मात्र, विकासकामांसाठी निधीची तरतूद आणि मंजुरीवरून त्यांचे सत्ताधाऱ्यांशी मतभेद झाले. त्याच्यातून त्यांनी सत्ताधाऱ्यांची साथ सोडली होती. आता त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पालिकेमध्ये भाजपचा एकही नगरसेवक राहिलेला नाही.

Related Stories

No stories found.