Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; 'या' बड्या अधिकाऱ्याला अटक

Dapoli News : साई रिसॉर्ट प्रकरणी अजून कुणाची चौकशी करण्यात येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sai Resort
Sai Resort Sarkarnama

Ratnagiri News : रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी आज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तात्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीच्या ताब्यातून दापोली पोलिसांनी अटक केली.

साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक सदानंद कदम हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर तात्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीने अटक केली होती. मात्र, आज ईडीच्या ताब्यातून दापोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Sai Resort
Shocking News : `पीडब्ल्यूडी` मंत्री ते अधिकारी अशी घेतात भ्रष्टाचाराची टक्केवारी...

जयराम देशपांडे यांना न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा आरोप जयराम देशपांडे यांच्यावर आहे.

साई रिसॉर्टला बिनशर्त परवाना दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या पार्श्वभूमीवर दापोली पोलिसांनी इडी कोठडीतून या गुन्ह्यात वर्ग करून जयराम देशपांडे यांना आज अटक केली.

Sai Resort
Praniti Shinde on BJP : महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री काँग्रेस देईल; प्रणिती शिंदेचा दावा

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दापोली पोलीसानी देशपांडे यांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने देशपांडे यांना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, साई रिसॉर्ट प्रकरणी अजून कुणाची चौकशी करण्यात येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com