Barsu Refinery Protest : मोठी बातमी! बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित

Barsu Refinery Protest : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकारण देखील तापले आहे.
Barsu Refinery Protest
Barsu Refinery Protest Sarkarnama

Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीमध्ये सरकारसोबत आंदोलकांची चर्चा होण्याची शक्यता आहे.

रिफायनरी प्रकल्पासाठी भू सर्वेक्षण केलं जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यामुळे तेथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सरकारने आंदोलकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतरही ते आंदोलनावर ठाम राहिले.

Barsu Refinery Protest
Darwha APMC : ‘मविआ’ विरुद्ध शिवसेनेत (शिंदे गट) घमासान, भाजपला दाखवला बाहेरचा रस्ता !

त्यानंतर आज बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील वाद चिघळल्याचे पाहायला मिळाले. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Barsu Refinery Protest
Barsu Refinery Protest: मी देखील तेथे जाणार, मग बघू...; बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजू शेट्टींचा सरकारला इशारा

दरम्यान, आंदोलकांनी तीन दिवस आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांमध्ये माती सर्वेक्षण थांबलं नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करु, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलन करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीने एका वृत्तवाहीनीशी बोलताना ही माहिती दिली.

आंदोलकांबरोबर या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशासन ठिकाणी दाखल झाले. तसेच प्रशासनाच्यावतीने चर्चेसाठी आंदोलकांना आवाहन करण्यात आलं. मात्र, तुर्तास तरी आंदोलकांनी प्रशासनाशी चर्चा करण्यास बहिष्कार घातला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com