भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रांत यांना आरक्षणात लाॅटरी...

Bhaskar Jadhav|Vikrant Jadhav|Shivsena| ZP Election : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण ६२ पैकी ३१ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
Bhaskar Jadhav and Vikrant Jadhav Latest News
Bhaskar Jadhav and Vikrant Jadhav Latest News Sarkarnama

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या (ZP) एकूण ६२ पैकी ३१ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आरक्षण सोडतीवेळी कोकरे आणि उमरोली गटासाठी मागील वेळी महिलाच आरक्षण (Reservation) होते, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानुसार केलेल्या चाचपणीनंतर तेथील गटांचे सर्वसाधारण महिला आरक्षण काढून नव्याने दोन जागांसाठी पुन्हा चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आरक्षणात अध्यक्षांचा गट सुरक्षित असला, तरी उपाध्यक्षांना अन्य मतदारसंघ शोधावा लागणार आहे. (Bhaskar Jadhav and Vikrant Jadhav Latest News)

Bhaskar Jadhav and Vikrant Jadhav Latest News
Sindhudurg ZP : राणे समर्थक गोट्या सावंत, संजना सावंत यांना फटका

येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तेजस्विनी पाटील आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षणाच्या चिठ्ठ्या पूजा पास्टे या मुलीने काढल्या. निवडणूक निर्णय विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात नागरिकांच्या मागास वर्गासाठी २७ टक्क्यांप्रमाणे १६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. त्यातील आठ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे.

आरक्षण प्रक्रियेनंतर कोकरे गटाचे आरक्षण गतवेळी सर्वसाधारण महिला असतानाही या वेळी पुन्हा महिला आरक्षण काढण्यात आल्याचा आक्षेप संतोष चव्हाण यांनी घेतला होता. त्याचवेळी उमरोली गटाबाबतही तीच सूचना करण्यात आली. दोन्ही सूचनांची उलटतपासणी जिल्हाधिकारी पाटील यांनी तत्काळ केली. त्यात दोन्ही आक्षेप ग्राह्य असल्याचे निदर्शनास आले. कोकरे, उमरोली गट सर्वसाधारण महिला आरक्षण यादीतून बाजूला काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा उर्वरित खुल्या गटातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात ताम्हाणे, शुंगारतळी हे दोन गट महिलांसाठी झाले आहेत. पुढे माभळे, पावस या गटासंदर्भातही आक्षेप घेतला गेला. परंतु, तेथील निर्णय योग्य असल्याचे सांगण्यात आले. तसेच, आरक्षणाविषयीच्या हरकती पुढील तीन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावयाच्या आहेत.

Bhaskar Jadhav and Vikrant Jadhav Latest News
संतप्त सोनियांनी स्मृती इराणींना फटकारले... अखेरीस सुप्रिया सुळेंनी केली मध्यस्थी!

दरम्यान, अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा असगोली गट अबाधित राहिला आहे. उपाध्यक्ष उदय बने यांचा करबूड गट इतर मागास वर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना अन्य मतदारसंघाचा शोध घ्यावा लागेल. गोळप गट अनारक्षित असल्याने तेथून बने यांचा प्रयत्न राहील, अशी चर्चा आहे. माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, महेश नाटेकर यांचा पत्ता कट झाला असून, माजी अध्यक्ष रोहन बने यांना अन्य मतदारसंघाकडे मोर्चा वळवावा लागेल.

विक्रांत जाधव, नेत्रा ठाकूर सुरक्षित

गुहागर : जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण पडले; तर नेत्रा ठाकूर यांचा वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे हे दोघेही नशिबवान ठरले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांचे कार्यक्षेत्र असलेला पडवे गट महिलांसाठी आरक्षित झाला. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण ओक यांचा वेळंब जिल्हा परिषद गट नव्या रचनेत दोन जिल्हा परिषद गटांत विभागला गेला आहे. शृंगारतळी आणि कोंडकारुळ या दोन्ही नव्या जिल्हा परिषद गटात प्रवीण ओक यांना आरक्षणामुळे संधी मिळणार नाही. कोंडकारुळ गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर शृंगारतळी गट महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in