Bhai Jagtap, Hitendra Thakur
Bhai Jagtap, Hitendra Thakursarkarnama

पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांच्या घरी नेत्यांची वर्दळ वाढली..

निवडणुकीला मदत करण्यासाठी भाई जगताप Bhai Jagtap यांनी सांगितले आहे. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगून श्री. ठाकूर Hitendra Thakur यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

विरार : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मते मिळवण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व उमेदवार भाई जगताप यांनी आज ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात विरार येथे भेट घेतली. भेटीतील चर्चा गुलदस्त्यात असली तरी ठाकूर आणि जगताप यांनी आमचे जुने संबंध असल्याने भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी भाई जगताप यांनी निवडणुकीत मदत करण्याचे आपल्याला सांगितल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीवेळी राजकीय आखाड्याच्या केंद्रस्थानी विरार होते. आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी विरार येऊ लागले आहे. काँग्रेसचे नेते व उमेदवार भाई जगताप व आमदार हितेंद्र ठाकूर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्टींनी भाई जगताप याना हितेंद्र ठाकुर यांची भेट घेण्यासाठी आज पाठवले. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूरसह, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळावी, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.

Bhai Jagtap, Hitendra Thakur
काँग्रेस नेत्यांचा इशारा... तर अभियंत्यांची झोपमोड करू!

काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी 10 मते कमी पडत आहेत. त्यासाठी भाई जगताप आज विरार येथे आले होते. राज्य सभेच्यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीत पडल्याने यावेळी आता पासूनच महाविकास आघाडीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाई जगताप आणि ठाकूर यांच्यात तीन तास बंद दाराआड चर्चा झाली.

Bhai Jagtap, Hitendra Thakur
विरारमध्ये सेनेला धक्का; शिवसैनिकांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश...

हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीनंतर भाई जगताप यांनी सांगितले, हितेंद्र ठाकूर हे जुने मित्र आहेत. मी विरार येथे माझया नातेवाइकांना भेटायला आलो होतो. तेथून निघाल्यावर हितेंद्र ठाकूर यांची भेट घ्यायला आलो. मैत्रीच्या गप्पा झाल्यावर मी निवडणुकीला उभा असून मला मदत करा, अशी मी त्यांना विनंती केली आहे.

Bhai Jagtap, Hitendra Thakur
काँग्रेसचं अखेर ठरलं! भाई जगताप अन् हंडोरेंना विधान परिषदेची लॉटरी

भाजपाने एक नवीन संस्कृती जन्माला आणली आहे. आता पर्यंत बिनविरोध निवडणुका होत होत्या परंतु भाजप आता पैश्याच्या जोरावर निवडणुका जिंकत आहे, असा आरोप त्यांनी केला. तर ठाकूर यांनी सांगितले, निवडणुकीला मदत करण्यासाठी भाई जगताप यांनी सांगितले आहे. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगून ठाकूर यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com