BJP War Room : कोकणातील नेत्याच्या खांद्यावर भाजपच्या वॉर रूमची जबाबदारी!

बावनकुळे यांनी सोशल मीडियाच्या बैठकीत अविनाश पराडकर यांच्यावर प्रदेशाची महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते.
BJP
BJPSarkarnama

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेश सोशल मीडिया आणि मीडिया मॅनेजमेंट वॉर रूमच्या प्रमुखपदी सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील अविनाश पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ही नियुक्ती प्रदेश कार्यालयातून जाहीर केली आहे. (Avinash Paradkar appointed as BJP War Room Chief)

मीडिया वॉर रूम ही भाजपची महत्वाकांक्षी योजना असून त्यावर भाजपची केंद्रीय व प्रदेश यंत्रणा समन्वय राखून एकत्रित काम करत आहे. संपूर्ण राज्यात सोशल मीडिया यंत्रणा भक्कम करण्यात येत आहे. या वॉर रूमवर पराडकर यांची झालेली नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून भाजप कार्यकर्त्यांनी व सिंधुदुर्ग सोशल मीडिया टीमने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

BJP
Women CM : ठाकरेंच्या मनातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण...? सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे की पंकजा मुंडे?

चांगल्या कामाची दखल भाजपत निश्चितच घेतली जाते, हे यातून दिसून आले, असे मत सिंधुदुर्ग सोशल मिडिया जिल्हा संयोजक समीर प्रभुगावकर यांनी व्यक्त केले आहे. पराडकर यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी संयोजक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

BJP
Gram Panchayat Election : ‘आमच्या उमेदवाराला बिनविरोध द्या; अन्यथा वाईट परिणाम होतील’ : अर्ज भरण्यास आलेल्या महिलेला दमदाटी

नुकताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा झाला त्यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या बैठकीत पराडकर यांच्यावर प्रदेशाची महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार बुधवारी त्यांनी पराडकर यांच्या वॉररूम प्रमुखपदाच्या नियुक्तीची घोषणा करत सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुखद धक्का दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com