Anil Parab : अनिल परब यांना दिलासा; साई रिसॉर्ट प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर!

Anil Parab : पर्यावरण नियमांचे उल्लंघन करुन रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधण्यात आले होते.
Anil Parab
Anil Parab sarkarnama

रत्नागिरी : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात माजी मंत्री अनिल परब यांना आता न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना अखेर अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे.

Anil Parab
Shivsena : शिंदे आणि गट फडणवीसांना संपवायचा आहे..

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर दापोली येथील साई रिसॅार्टबाबत आरोप केले होते. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करुन रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधण्यात आले होते. याप्रकरणी खेड व दापोली न्यायालयात अ‍ॅड. परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

साई रिसॉर्टचे १५ हजार ८०० स्क्वेअर फुटाचे बांधकाम करताना रोख रक्कम वापरण्यात आल्याचा संशय आहे. तसेच या प्रॉपर्टीचा करही परब यांनी भरण्यात आळा आहे. याचीही आयकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे आरोप किरीट सोमय्या यांनी परबांवर केले होते.

Anil Parab
Rahul Gandhi vs Savarkar : राहुल गांधींच्या विरोधात शिंदे गट आक्रमक, दुसरी तक्रार दाखल

याप्रकरणात आता न्यायायालयाने परब यांना अटकपूर्व जामीन मंजृर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खेडमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाने परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वकील अॅड सुधी बुटाला यांनी अनिल परबांच्या वतीने जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com