Anil Parab : परब यांच्यावर 'एफआयआर' दाखल : कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता!

Anil Parab : उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Kirit Somaiya, Anil Parab
Kirit Somaiya, Anil Parabsarkarnama

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. रत्नागिरीतील दापोली रिसॉर्ट प्रकरणी आता परब अडचणी आले आहेत. परब आणि इतर तीन जणांविरोधांत गुन्हा दाखल झाला आहे. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. परबांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी आरोप केले होते.

याबाबतीत सोमय्या म्हणाले की, रत्नागिरीतील दापोली रिसॉर्ट प्रकरणी आता अनिल परब विरोधात एफआरआय दाखल झाला आहे. बिडीओ यांनी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोदवली. एका व्हिडीओद्वारे त्यांनी ही माहिती दिली. आता एफआरआय दाखल झाल्यानंतर परबांवर अटकेची तलवार टांगली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.

Kirit Somaiya, Anil Parab
शिंदे, फडणवीसांनी निवडणुका गुजरात मधूनच लढवाव्यात!

दरम्यान, पर्यावरण नियमांचे उल्लंघन करुन रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधण्यात आले आहे. याप्रकरणी खेड व दापोली न्यायालयात अ‍ॅड. परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

Kirit Somaiya, Anil Parab
आमदार अशोक पवार यांचा पाचव्यांदा विक्रमी विजय; मोठ्या तयारीने उतरलेल्या भाजपला धक्का

दापोली न्यायालयात अनिल परबांविरोधात फसवणूक याचिका दाखल आहे. साई रिसॉर्टचे १५ हजार ८०० स्क्वेअर फुटाचे बांधकाम करताना रोख रक्कम वापरण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या प्रॉपर्टीचा करही परब यांच्याकडून भरण्यात आला आहे. याचीही आयकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in