राणे तोंडघशी! बालेकिल्ल्यातच त्यांना अन् भाजप कार्यकर्त्यांना गावबंदी

नितेश राणे त्यांच्या बालेकिल्ल्यातच आले अडचणीत
Nitesh Rane
Nitesh Ranesarkarnama

कणकवली : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आता त्यांच्या बालेकिल्ल्यात तोंडघशी पडले आहेत. त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना गावबंदी करीत असल्याचे बॅनर लावला आहे. राणेंनी गावाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निषेध म्हणून हे राणेंना गावबंदी करण्याचे पाऊल त्यांनी उचलले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अखेर राणेंनी खुलासा केला असून, विरोधकांकडे बोट दाखवलं आहे.

आमदार नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच निषेधाचा बॅनर लागल्याने त्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी गावाची नितेश राणे यांनी भाषणात बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून हे बॅनर लावण्यात आले आहेत. गावात राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी करत असल्याच्या बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आनंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा बॅनर लावला आहे.

Nitesh Rane
सोमय्यांची जखम खरी की खोटी? वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

देवगड हा नितेश राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. यामुळे नितेश राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर त्यांनी आता खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या भाषणावर गैरसमज निर्माण करून विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत. आनंदवाडीतील लोकांबरोबर माझं जुनं नात आहे. त्यामधे कुठेही कटुता येऊ नये. मी जे भाषण केलं ते माझ्या मतदारसंघाच्या तरूण, तरूणींच्या भविष्यासाठी केलेलं आहे. त्यात मी कुठंही चुकलेलो नाही. पण जे लोक याचं घाणेरडं राजकारण करताहेत, त्यांनी योग्यवेळी माझ्या जनतेने ओळखावं एवढीच विनंती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com