अमित ठाकरे मैदानात; राज्यभर मनविसे पुनर्बांधणी 'महासंपर्क' अभियान राबवणार

अमित ठाकरे (Amit Thackeray) लवकरच कोकणचा दौरा करणार आहेत
Amit Thackeray
Amit Thackeraysarkarnama

मुंबई : राज्याच्या राजकारणत वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे (Shivsena) ४० आमदार घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष एकिकडे सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना वाढीव भर देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी (MNS) सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आता सक्रिय झाले आहेत. ते कोकणात महासंपर्क अभियानाची सुरुवात करणार आहेत.

Amit Thackeray
राज्यात काय चाललंय हे जनतेला दिसतयं..! ; जयंत पाटलांचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा

अमित ठाकरे यांचा दौराही जाहीर झाला आहे. या संदर्भात मनसेने ट्वीट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की ''महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे राज्यस्तरीय मनविसे पुनर्बांधणी 'महासंपर्क' अभियान लवकरच सुरू होत आहे. 'महासंपर्क'च्या पहिल्या टप्प्यात अमित ठाकरे हे ता. ५ ते ११ जुलै दरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा सात दिवसांचा दौरा करणार आहेत.

Amit Thackeray
शरद पवारांनी आरोप फेटाळला ; म्हणाले, 'याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही'

या दौऱ्यात ते पक्ष पदाधिकारी तसेच मनविसे पदाधिकारी यांच्यासह पक्षात सक्रिय काम करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्याशी संवाद बैठका घेणार आहेत. बघता काय? सामील व्हा!'' असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) असो किंवा माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असतो यांच्यापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला पोहचण्याची सोय नाही. त्यामुळे शिवसेनेत फुट पडल्यानंतर माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सभा आणि मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता अमित ठाकरेही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ठाकरेपर्यंत सहजा-सहजी पोहचता येत नाही, अशी कार्यकर्त्यांची नाराजी असते, त्यासाठी आता ठाकरेंची पुढची पिढी मैदानात उतरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com