Kokan News : कोकणात शिवसेनेच्या विरोधात भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिंदे गट एकत्र

लांजा खरेदी-विक्री संघ निवडणूक : शिवसेनेच्या शिवशाही सहकार पॅनेलच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिंदे गट यांनी एकत्र येत सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे.
Lanja kharedi-vikri Sangh Election
Lanja kharedi-vikri Sangh ElectionSarkarnama

लांजा (जि. रत्नागिरी) : लांजा तालुका खरेदी-विक्री संघाच्या (Lanja kharedi-vikri Sangh) निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवशाही सहकार पॅनेलच्या विरोधात भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), शिंदे गट (Shinde Group) यांनी एकत्र येत सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. या पॅनेलमध्ये सरळ दुरंगी लढत होणार आहे. कोरोनामुळे सात वर्षांनंतर निवडणूक होत असून दोन्ही पॅनेलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. (All parties united against Shiv Sena in election of Lanja kharedi-vikri Sangh)

लांजा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधात सर्वपक्षीय सहकार पॅनेल उभे ठाकले असल्याने अधिकच रंगत वाढणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक येत्या १५ जानेवारीला होणार आहे. सहकार पॅनेलचे प्रमुख उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हा बॅंकेचे संचालक अजित यशवंतराव, मुन्ना खामकर व शिंदे गटाचे राजू कुरूप यांनी या वेळी कोणत्याही परिस्थितीत संघावर सहकार पॅनेलचे वर्चस्व राहिले पाहिजे, यासाठी कंबर कसली आहे.

Lanja kharedi-vikri Sangh Election
NCP News : राष्ट्रवादीच्या कटकटी संपेनात : लोकसभेतील एकाची खासदारकी जाणार; संख्याबळ घटणार

शिवसेना शिवशाही सहकार पॅनेलचे संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी जोरकसपणे प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही पॅनेलमधून तुल्यबळ उमेदवार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. दर पाच वर्षांनी होणारी निवडणूक कोरोना काळात वाढ मिळाल्यामुळे सात वर्षांनी होत आहे. संघाच्या १७ जागेसाठी ही निवडणूक होणार असून मतदारांना प्रत्यक्ष भेटून मतदान करण्याची विनवणी उमेदवारांकडून केली जात आहे.

Lanja kharedi-vikri Sangh Election
Sunil Kedar मोठी बातमी : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

सर्वपक्षीय सहकार पॅनेलमधून संस्था मतदार संघातून रवींद्र खामकर, चंद्रकांत मांडवकर, शैलेश घाग, स्मिता दळवी, पद्माकर भागवत, पांडुरंग दाभोळकर, सुनील पेडणेकर, विकास मांडवकर, सुरेंद्र खामकर, दीप्ती कदम, व्यक्तिगत सभासद मतदारसंघातून विकास चव्हाण, नुरुद्दीन सय्यद, इतर मागासवर्ग प्रवर्ग मतदार संघातून गुरूप्रसाद तेली, भटक्या विमुक्त अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून महेंद्र शेडे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून संजय कांबळे, महिला राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून धनिता चव्हाण आणि स्वप्ना सावंत निवडणूक लढवत आहेत.

Lanja kharedi-vikri Sangh Election
राष्ट्रवादीकडील मुंबई बाजार समिती ताब्यात घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव भाजपने उधळला; फडणवीसांनी सूत्रे हलवली?

शिवशाहीर सहकार पॅनेलमधून प्रवेश घारे, राहुल शिंदे, चंद्रकांत मणचेकर, सुरेश साळवी, सुभाष लाखण, सुभाष पवार, विश्वास मांडवकर, शरद चरकरी, मोहन घडशी, महादेव खानविलकर, चंद्रशेखर तेडुळकर, केशव कुपटे, उमेश लोटणकर, संतोष बेनकर, सायली तोडकरी, तेजस्विनी शेट्ये निवडीच्या रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com