Ajit Pawar : ''भास्करराव पाठीशी उभे राहिल्याशिवाय 2019 ला सुनील तटकरेंचा विजय शक्यच नव्हता..''

Bhaskar Jadhav And Sunil Tatkare : जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही....
Sunil Tatkare-Bhaskar Jadhav
Sunil Tatkare-Bhaskar JadhavSarkarnama

Bhaskar Jadhav And Sunil Tatkare News : लोकसभेच्या २०१४ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना निसटता पराभव स्विकारावा लागला. त्यावेळी नऊ उमेदवार सुनील तटकरे नावाचे नऊ उमेदवार रिंगणात होते. याचाही फटका त्या निवडणुकीत त्यांना बसला. मात्र, त्यांनी या अपयशानंतर खचून न जाता, मागे वळून न पाहता २०१९ लोकसभेसाठी जिद्द आणि चिकाटीनं तयारी केली. आणि २०१९ला ३१ हजार ५०० मतांनी विजय मिळवत मागील पराभवाची भरपाई भरुन काढली. आणि हा विजय भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) पाठीशी उभं राहिल्याशिवाय शक्यच नव्हता असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, सुनील तटकरे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारकीनंतर खासदार म्हणून दिल्लीत काम करत आहे. पण २०१९ साली पवार साहेबांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचं सरकार आणलं तेव्हा तटकरे यांच्या मनात एक भावना आली की, जर मी खासदार झालो नसतो दिल्लीला गेलो नसतो आणि आमदार होऊन महाराष्ट्रातच राहिलो असतो मंत्री झालो असतो असा चिमटाही पवारांनी काढला.

Sunil Tatkare-Bhaskar Jadhav
Jayant Patil: राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचं 'ते' टि्वट, राजकीय चर्चांना उधाण

पवार म्हणाले, तटकरे यांचे वडील ज्यावेळी दौर्यावर जात असत. त्यावेळी त्यांची गाडी चालविण्याची जबाबदारी ही सुनील तटकरे यांच्यावर असायची. त्यावेळी ते फक्त गाडीच चालवत नसत तर बारकाईने राजकारणावरील गप्पागोष्टी एेकत असत. पण सातत्याने राजकारणासंबंधी गोष्टी, विचार कानावर पडल्यामुळे ते चांगले तयार झाले. आणि असं म्हणतात की, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यांच्या याच सवयीची तटकरे यांना पुढील कामात मदत होत आली आहे.

Sunil Tatkare-Bhaskar Jadhav
BJP News : नऊ राज्य जिंकण्यासाठी भाजपची रणनीती ठरली ; साडेतीन हजार संघटक मैदानात उतरणार

ते दिल्लीला असले तरी रायगडमध्ये काय चाललंय, रोह्याला काय चाललंय, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यालयात काय चाललंय अशी सर्व माहिती त्यांना असते. आणि ते माहिती असलंही पाहिजे. त्यामुळे पुढील निर्णय घ्यायला सोपं जातं असेही पवार यावेळी म्हणाले.

आपल्या सर्वांची बारकाईने माहिती जर कुणाला माहिती असेल तर ती आपल्या ड्रायव्हरला असते. जी माहिती आपल्या घरच्यांनाही नसते ती ड्रायव्हरला असते. बाबा कुठं गेला, कुठं थांबला,किती वेळ थांबला, रुम कशा बदलल्या, कुठल्या रुममध्ये शिरला आणि कुठल्या रुममधून बाहेर पडला अशी माहिती ड्रायव्हरला असते असं विधान अजित पवारांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com