योगेश कदमांनी बंड केले अन्‌ सूर्यकांत दळवींची राजकीय साडेसाती संपली!

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेमुळे सूर्यकांत दळवी गटाला मिळाला बूस्टर
Aditya Thackeray's Shivsamvad Yatra
Aditya Thackeray's Shivsamvad YatraSarkarnama

दाभोळ (जि. रत्नागिरी) : शिवसेनेतून (Shivsena) बंड करून ४० आमदारांनी महाविकास आघाडीला धक्का देऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेला खिंडार पाडल्याने शिवसेनेतील बाजूला राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांचा गट पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या यात्रेने शहर ढवळून निघाले अन् संवादयात्रेमुळे दळवी गटाला बूस्टर मिळाला. (Aditya Thackeray's Shivsamvad Yatra booster for Suryakant Dalvi group)

दापोली विधानसभा मतदार संघाचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या सूर्यकांत दळवी यांचा शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत गेलेल्या संजय कदम यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतर पहिले काही महिने सूर्यकांत दळवी राजकीय विजनवासात गेले होते. त्याचा फायदा घेऊन शिवसेनचे नेते व तत्कालीन मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदार संघात लाँच केले होते.

Aditya Thackeray's Shivsamvad Yatra
Maharashtra ATS : पंधरा लाखांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवाद्याला महाराष्ट्र एटीएसने पकडले

रामदास कदम यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत दापोली विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केली होती. दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या बाजूला वळवले होते. त्यामुळे सूर्यकांत दळवी बाजूला पडले होते. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अनेक कार्यकर्तेही योगेश कदम यांच्याबरोबर गेल्याने काही मोजकेच कार्यकर्ते दळवी यांच्यासोबत राहिले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचे नशिब जोरदार ठरले. राजकारणात पुन्हा स्थान मिळाले अन् आता तर त्यांना पुन्हा महत्व आले आहे.

Aditya Thackeray's Shivsamvad Yatra
आता सरकारही गेलं आणि मामाही गेले : हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रेय भरणेंना टोमणा

बंड करणाऱ्या ४० आमदारांमध्ये आमदार योगेश कदम यांचाही समावेश होता. त्यामुळे शिवसेनेची पुन्हा बांधणी करण्यासाठी दापोली शिवसेनेची जबाबदारी सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली आणि ७ वर्षे शिवसेनेपासून बाजूला असलेल्या दळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांची साडेसाती संपली. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची दापोलीतील संवादयात्रा यशस्वी करण्यात दळवी गट सफल झाला आहे.

Aditya Thackeray's Shivsamvad Yatra
हायकोर्टाचा फडणवीसांना धक्का; कल्याणशेट्टींच्या प्रस्तावावरील शिफारस केली अमान्य!

दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून दळवी यांच्या हातात शिवसेनेची सुत्रे देण्यात आली. राष्ट्रवादीशी आघाडी करून या दोन्ही नगरपंचायतींवर आघाडीची सत्ता आली. योगेश कदम यांच्याजवळ असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना बाजूला करून दळवी यांच्या गटातील कार्यकर्त्यांची त्या जागी वर्णी लावण्यात आली होती.

सूर्यकांत दळवी-योगेश कदमांमध्ये संघर्ष पेटणार

आता दळवी गट व आमदार योगेश कदम यांच्यात दापोली विधानसभा मतदार संघात संघर्ष पाहावयास मिळणार आहे; मात्र त्यासाठी शिवसेना नेतृत्वाकडून दळवी गटाला रसद मिळणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com