कदम पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे घेणार समाचार; दापोलीत १६ सप्टेंबरला 'निष्ठा यात्रा'

दापोली विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून 2014 मध्ये या मतदार संघात प्रथम गद्दारी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघात गद्दारीची कीड वाढत गेली.
Yogesh&Ramdas kadam-Aditya Thackeray
Yogesh&Ramdas kadam-Aditya ThackeraySarkarnama

दाभोळ : संपूर्ण राज्यभर सुरू असलेली युवासेना (yuvasena) प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची निष्ठा यात्रा १६ सप्टेंबरला दापोलीत येणार असून या दौर्‍यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, अशी माहिती दापोलीचे (Dapoli) माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Aditya Thackeray's Nishta Yatra will arrive in Dapoli on September 16)

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांचा समाचार घेण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण राज्यामध्ये निष्ठायात्रेचे आयोजन केले आहे. मुंबई येथून सुरू झालेली ही यात्रा मराठवाडा, खानदेश नंतर कोकण विभागात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी कोकणातील रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. गणेशोत्सवानंतर ही यात्रा पुन्हा सुरू होत असून या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे.

Yogesh&Ramdas kadam-Aditya Thackeray
‘भास्करशेठ येऊदे, नाहीतर रामदासभाई; गुहागरचा पुढील आमदार मनसेचाच’

16 सप्टेंबरला सायं. 4 वा. वाकवली येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत दापोली मतदार संघाच्यावतीने करण्यात येणार असून, तेथून बाईक रॅलीने त्यांचे दापोलीत आगमन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जवळच असलेल्या सभास्थानी येणार आहेत. या वेळी त्यांच्यासमवेत माजी पालकमंत्री शिवसेना सचिव अनिल परब, शिवसेना नेते माजी खासदार अनंत गिते, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते आमदार राजन साळवी, उपनेते अमोल किर्तीकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

Yogesh&Ramdas kadam-Aditya Thackeray
अमित शहांच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी ‘यूपी’तील शिवसेना नेत्यांना लावले कामाला!

दळवी म्हणाले, दापोली विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून 2014 मध्ये या मतदार संघात प्रथम गद्दारी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघात गद्दारीची कीड वाढत गेली. नुकत्याच झालेल्या सत्ताबदलामध्ये या मतदार संघाच्या आमदारांनी उघड गद्दारी केली आहे. मातोश्रीवर टीका करण्यापर्यंत मजल आतापर्यंत शिवसेनेत विविध पदे भोगलेल्या रामदास कदमांची गेली असून, या सर्वाचा समाचार या दौर्‍यात घेतला जाणार आहे. दापोली विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेला पोषक वातावरण असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे शिवसेनिकांमधील संभ्रम दूर होईल व पुन्हा नव्या जोमाने शिवसेना या मतदार संघात पाय रोवून उभी राहिल.

Yogesh&Ramdas kadam-Aditya Thackeray
तामीळनाडूच्या महिलांनी राहुल गांधींसमोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव...

या पत्रकार परिषदेला दापोली विधानसभा मतदार संघाचे मुंबई संपर्कप्रमुख रूपेश बेलोसे, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, शहरप्रमुख संदीप चव्हाण, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी, माजी तालुकाप्रमुख शांताराम पवार, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, सागर करमरकर, उमेश शिंदे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com