आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर मात्र केसरकरांच्या घरासमोरून जावू शकणार नाहीत; कारण..

Aditya Thackeray|Shivsena : आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून उद्यापासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News sarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची निष्ठा यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे. मात्र, त्यांच्या सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून निघणाऱ्या निष्ठा यात्रेच्या रॅलीला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. येथे शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे घर असल्याने कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून त्यांच्या घरासमोरून आदित्य यांच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असूनही आदित्य यांना केसरकरांंच्या घरासमोरून जाता येणार नाही. (Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News)

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
खासदार राऊतांच्या अटकेची अधिकृत घोषणा रात्री उशीरा होणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं होते. त्यानंतर सुमारे १२ खासदारांनी सुद्धा शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

पक्षाच झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेटी देत आहेत. उद्या त्यांची निष्ठा यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे. मात्र या निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य यांची सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून रॅली निघणार होती. मात्र, पोलिस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारली आहे. यामुळे शिसनेनेला केसरकरांच्या घरासमोर शक्तीप्रदर्शन करता येणार नाही.

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
राज्यपाल कोश्यारींची भाजप प्रवक्तेपदी नेमणूक करा; शिवसैनिकांनी केली मागणी

येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता ही रॅली गवळी तिठ्या ऐवजी चिटणीस नाका ते गांधी चौक अशी रॅली होणार आहे. आदित्य यांच्या निष्ठा यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून उद्यापासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये ते प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या सकाळी साडेअकरा वाजता कुडाळ येथे आदित्य यांची निष्ठा यात्रा होईल. त्यानंतर सावंतवाडी येथे मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
मराठी माणसांशी केलेल्या बेईमानीची किंमत संजय राऊतांना चुकवावीच लागेल

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या केसरकरांच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निष्ठा यात्रा येणार असल्यामुळे शिवसैनिक चांगलेच कामाला लागले आहे. शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर केसरकर हे सातत्याने शिंदे गटाची बाजू माध्यमांसमोर मांडत असून शिवसेनेच्या टीकेला उत्तरही देत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष आहे. नेमक त्याचमुळे काही गोंधळ होऊ नये यामुळे पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in