Ratnagiri Politics|आदित्य ठाकरेंनी शंंभर कोटी घेतले; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

Shinde Group| Shivsena| आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेने शिंदे गटाची धाकधुक मात्र वाढली आहे.
Ratnagiri Politics|
Ratnagiri Politics|

रत्नागिरी : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील मतभेद टोकाला गेले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा शुक्रवारी (१६ सप्टेंबर) रत्नागिरीत पोहचली. पण या यात्रेने शिंदे गटाची धाकधुक मात्र वाढली आहे. आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौऱ्यानंतर रामदास कदम यांनी खेडमध्ये बोलताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे शंभर कोटी रुपये घेतले, असा आरोप रामदास कदम यानी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणारे पत्रही दिल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

Ratnagiri Politics|
Eknath Khadse: रस्त्याची कामे न करताच कोट्यवधींचा गैरव्यवहार?

शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना चांगलचं माहिती आहे.आता कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये.अडीच वर्षात ते कधीही बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर", अशी टीका रामदास कदम यांनी केली.

इतकेच नव्हे तर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली आहे."चिपळूणचे चीनपाट नाच्या आमदार भास्कर जाधव हा नाच्या आमदार आहे, त्यांची औकात काय?", अशी गंभीर टीका रामदास कदम यांनी केली. मी केशवराव भोसले यांच्या गाडीवर ड्राइव्हर होतो असे बोलतो ते केशवराव भोसले अजून जिवंत आहेत त्यांना विचारा, असं रामदास कदम म्हणाले. दरम्यान आज (१८ सप्टेंबर) दापोलीत शिंदे गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात सगळ्यांचा खरपूस समाचार घेणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in