त्यांचं नाव मी घेणार नाही, नाहीतर ते माझं वय काढतील; आदित्य ठाकरेंचा केसरकरांना टोला...

Aditya Thackeray|Shivsena : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे.
Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News sarkarnama

सावंतवाडी : शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा आज सिंधुदुर्ग जिल्ह्या येथून सुरू झाला आहे. दरम्यान शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आयोजीत मेळाव्यात आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. दरम्यान भाषणादरम्यान केसरकरांचं जर मी नावं घेतलं तर ते माझ वय काढतील, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. (Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News)

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
उद्धव ठाकरेंची सेना संपणार अन् एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहणार !

आदित्य ठाकरे म्हणाले, कुणीतरी मला म्हणालं की, आदित्य आपल्याला जनआशिर्वाद यात्रेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मला आज जे काही घडलं त्याचा आनंद होत नाही. काही सोडून गेले त्यापैकी काहींना मी लहानपणापासून बघत आहे. मात्र, २०१४ नंतर शिवसेनेत आलेले आपल्याला हिंदूत्व आणि शिवसेना शिकवत आहेत, असा आदित्य यांनी केसरकरांना टोला लगावला.

पुढे ते म्हणाले की, आता इथले महाशय यांचं तर मी नावच घेणार नाही, कारण ते लगेच माझ वय काढतात. मी कधीही कुणाला सांगितलं नाही की मला साहेब म्हणा. मला मोठ्यांनी आदित्य, छोट्यांनी आदित्य किंवा दादा म्हणा, मित्र म्हणा तर कुणी मला एटी म्हणत कुणी आदित्य साहेब म्हणतं. मात्र आपण कधीही कुणाला साहेब म्हणा, असे म्हटलं नाही. पक्षाने मला शिवसैनिक म्हणून जी अशी ओळख दिली आहे. त्याचा मला अभिमान आहे. मी कधीही माझी ओळख आणि नाव विकलं नाही,असा जोरदार टोलाही त्यांनी केसरकर आणि बंडखोर आमदारांना लगावला आहे.

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
जनतेच्या डोळ्यात अश्रू होते, तेव्हा हे ४० गद्दार निर्लज्जपणे टेबलावर नाचत होते...

आदित्य म्हणाले, काही असेही म्हणतात की मी आल्यावर उभे रहावे लागते. मात्र मी कधी म्हटलं नाही की मी आल्यावर उभे रहा. उलट कुणी आलं तर मी स्वत: दरवाजा उघडायचो. मी कधी उद्धटसारख वागलो नाही कारण तसे माझ्यावर संस्कार झालेले नाहीत. आम्ही सत्तेत असतांना किंवा आता आमच्या वागण्यात काय फरक पडला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्ही कधीही सत्तेला चिकटलो नाही. यांना पक्षाने किंवा आम्ही काय कमी केलं होत? मात्र त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना आजारी असतांना पाठीत खजींर खुपसला आहे, अशी घणाघाती टीका आदित्य यांनी केली.

Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News
कुत्रा निशाणी मिळाली तरी निवडून येईल, शिंदेनीच सांगितला सत्तारांचा काॅन्फिडन्स

दरम्यान, शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदारांनी अनेकदा 'मातोश्री'वर गेल्यावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भेट देत नाहीत. आमदार, खासदारांच म्हणने ऐकत नाहीत, असे अनेक आरोप केले आहेत. तर शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही एका मुलाखतीत आपल्याला आदित्य ठाकरे यांना साहेब म्हणावं लागत, असे म्हटले होतं तर दीपक केसरकरांनीही आदित्य यांनी टीका केल्यावर त्यांच वय काढलं होत. यामुळे कोकणात आणि केसरकरांच्या मतदारसंघात त्यांनी याचा उलगडा केला आहे. याबरोबरच बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना आता कपाळावर गद्दार असा शिक्का घेऊन फिरावे लागणार आहे, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in