Sai Resort : साई रिसॉर्ट प्रकरणी दापोलीतील बड्या अधिकाऱ्याला अटक; परबांच्या अडचणी वाढणार?

Dapoli News : रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी आज तिसरी अटक
Sai Resort
Sai Resort Sarkarnama

Ratnagiri News : रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी आज तिसरी अटक झाली आहे. याआधी सदानंद कदम, जयराम देशपांडे आणि आज सुधीर पारदुले यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. तर पारदुले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Sai Resort
Old Pension Scheme : सोलापुरातील माजी आमदार आडमांनी दिला जुन्या पेन्शन योजनेच्या लढ्यासाठी एक लाखाचा निधी

साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याच्या आरोपानंतर जयराम देशपांडे यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्या आधी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.

Sai Resort
Pension : खासदार धानोरकर म्हणाले, ‘त्या’ माजी खासदारांचे पेन्शन बंद करा !

सदानंद कदम यांची ईडी कोठडी आज संपली. त्यानंतर ईडीने त्यांची वाढवून मागितलेली कोठडीची मागणी न्यायालयाने फेटळली. तसेच सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

दरम्यान, सदानंद कदम हे अनिल परबांचे व्यावसायिक भागीदार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनिल परबांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com