Jyotiraditya Scindia In Kolhapur : ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौऱ्यावर; भाजपची लोकसभेसाठी रणनीती!

Kolhapur News : सरकारी कामांचा आढावा घेणार?
 Jyotiraditya Scindia : BJP
Jyotiraditya Scindia : BJPSarkarnama

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपकडून आतापासूनच जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून, भाजपकडून आखलेल्या लोकसभा प्रवास योजनेच्या दृष्टीकोनातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उद्यापासून (२३ मार्च ) दोन दिवसीय कोल्हापूर जिल्हा (Jyotiraditya Scindia In kolhapur) दौऱ्यावर येणार आहेत.

 Jyotiraditya Scindia : BJP
Nitin Gadkari news Update: नितीन गडकरींना धमकी; बंगळूरमधून तरुणी ताब्यात..

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ते कोल्हापूरच्या शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांशी भेटीगाठी घेणार आहेत तसेच, सरकाच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा प्रवास या पक्षाच्या कार्यक्रमानुसार ते सलग तिसऱ्यावेळी कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. मागे झालेल्या दोन दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरातील चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यामध्ये सरकानवे राबविलेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला होता.

 Jyotiraditya Scindia : BJP
Punjab News : खलिस्तानी समर्थक अमृतपालविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी ; पोलिसांची शोधाशोध सुरूच!

ज्योतिरादित्य सिंधियांचा असा असेल दौरा :

ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia In Kolhapur) यांचा उद्या गुरूवार रोजी, सकाळी पावने अकरा वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते शिरोळकडे रवाना होतील. संध्याकाळी पाच वाजता ते हातकणंगलेच्या हुपरी या ठिकाणी चांदी कामगारांशी चर्चा करून ते संवाद साधणार आहे. यानंतर ते शिरोळ तालुक्यातील एका कार्यक्रमास उपस्थित राहतील.

 Jyotiraditya Scindia : BJP
Abdul Sattar News: अब्दुल सत्तार यांच्यापुढे तरुण म्हणाले, `पन्नास खोके, एकदम ओके`

यानंतर ते करूंदवाडीमधील आणखी एका कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत, रात्रीच्या सुमारास कोल्हापूरात त्यांचे आगमन होईल, इथेच त्यांचा मुक्काम असणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ते जोतिबा मंदीराला भेट देतील, जोतिबा दर्शनानंतर ते पन्हाळाकडे प्रस्थान करणार आहेत. तेथे एका कार्यक्रमात ते सहभागी होतील. यानंतर एका स्थानिक कार्यक्रमास हजेरी लावून, यानंतर दुपारी दीडच्या सुमारास दिल्लीकडे उड्डाण घेतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com