"MIM'ने भाजपची 'बी' नाही हे सिद्ध करावं" : राष्ट्रवादीनेही धूडकावला युतीचा प्रस्ताव

MIM | NCP | Shivsena | Jayant Patil | Sanjay Raut : "MIM'वर लोकांचा विश्वास कमी"
Jayant Patil -
Jayant Patil - Sarkarnama

मुंबई : MIM पक्षाने महाराष्ट्रात भाजपला (BJP) हरवण्यासाठी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. ही ऑफर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेनेने (Shivsena) धुडकावून लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) देखील एमआयएमची (MIM)ऑफर नाकारली आहे. एमआयएम समविचारी पक्ष आहे का? याचा अभ्यास करावा लागेल. सध्या लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी आहे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एमआयएमचा युतीचा प्रस्ताव सध्या तरी नाकारला आहे.

जयंत पाटील म्हणाले, एमआयएमने ते भाजपची 'बी' टीम नाही, हे आधी सिद्ध करावे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अनेक उमेदवार हे अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्याठिकाणी एमआयएमने लक्षणीय मत घेतली आहेत. त्यांना जर युती करायची असेल ते ती केवळ औरंगाबाद, महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी विचार करावा लागेल. त्यांना आधी त्यांच्या भडकाऊ विधानांवर आणि भाषणांवर ताबा मिळवायला हवा त्यानंतरच पुढचा विचार केला जाईल असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Jayant Patil -
'एमआयएम'-महाविकास आघाडी युती होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले...

आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही एमआयएमचा प्रस्ताव धूडकावला होता. ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आणि तीनच पक्षांचे राहिलं. यात चौथा, पाचवा याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालणारे पक्ष आहेत. अशात जर कोणत्या पक्षाचा नेता औरंजेबाच्या कबरीवर जावून डोक टेकत असेल आणि ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. त्यामुळे युती होणार असल्याच्या सर्व अफवा आहेत, असेही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

Jayant Patil -
'स्वाभिमानी'च्या इशाऱ्यानंतर सांगली जिल्हा बँकेची माघार! विषय गुंडाळला

एमआयएमने सांगितले की आता पर्यंत आम्हाला भाजपची बी टीम म्हणून ओळखल जात आहे. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एमआयएम हे भाजपची बी टीमच आहेत. हे उत्तरप्रदेश आणि बंगालमध्ये आम्ही पाहिलं आहे, सिद्ध झालं आहे. आमचे स्पष्ट मत आहे, ज्यांचे आदर्श औरंगजेब आहेत, ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. अशा पक्षांशी महाविकास आघाडीचा कोणताही संबंध येणार नाही, त्यांच्याशी आमची कोणतीही छुपी किंवा उघड युती होवूच शकत नाही. ज्यांच्याशी त्यांची छुपी युती आहे ती त्यांची त्यांना लखलाभ असे म्हणत संजय राऊत यांनी हात जोडत एमआयएमशी कोणत्याही प्रकारची युती होणार नसल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in