Jalgaon : गुलाबराव राष्ट्रवादीवर घसरले, म्हणाले, आमच्यामुळे त्यांना जीवदान मिळाले..

शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवा यासाठीच आम्ही उठाव केला होता. आम्ही आठ मंत्री होतो, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही त्या मंत्रीपदाचा विचार केला नाही. (Gulabrao Patil, Jalgaon)
Ex.Minister Mla Gulabrao Patil News Jalgaon
Ex.Minister Mla Gulabrao Patil News JalgaonSarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी आमच्याबद्दल काय बोलते याकडे आम्ही लक्ष देत नाही, धनुष्यबाण कोणाचा हे राष्ट्रवादी नाही, तर निवडणूक आयोग ठरवणार आहे. (Jalgaon) त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, उलट आमच्यामुळेच राष्ट्रवादीला जीवदान मिळाले हे त्यांनी विसरू नये. गेली अडीच वर्ष आमचे तुमच्याशी चांगेल संबंध होते, ते तसेच राहू द्या, अशा शब्दात माजीमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादीला खडेबोल सुनावले.

जळगांव येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला देखील उत्तर दिले. (Shivsena) गेली अडीच तीन वर्ष आम्ही तेच सांगत होतो, उद्धव ठाकरे आजारी होते, पण आदित्य ठाकरे तरूण होते, त्यांनी तरी बाहेर फिरायला पाहिजे होते. आता जसे ते पायाला भिंगरी लावून दौरे करत आहेत, तसे आधी करायला हवे होते, आमची हीच तर मागणी होती, असेही पाटील म्हणाले.

राजीनामा देवून निवडून या, असे आव्हान ठाकरेंनी बंडखोरांना केले होते. याला उत्तर देतांना गुलाबराव म्हणाले, आम्ही राजीनामा देण्याचा प्रश्नच कुठे येतो, आम्ही पक्ष सोडलेला नाही, शिवसेनेचे आमदार म्हणूनच आम्ही काम करतो आहोत. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवा यासाठीच आम्ही उठाव केला होता. आम्ही आठ मंत्री होतो, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही त्या मंत्रीपदाचा विचार केला नाही, कदाचित आम्ही आठ मंत्री बाहेर पडलो नसतो तर इतके आमदार देखील बाहेर पडले नसते.

तेव्हा आम्हाला आमदारकीचं तुम्ही काय सांगताय. मंत्रीपदावर पाणी सोडून आम्ही शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. नेत्यांनी आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांच ऐकलं पाहिजे, हीच आमची मागणी होती. शेवटी आम्ही देखील तालुक्याचे प्रतिनिधित्व करतो, आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे होत्या.

Ex.Minister Mla Gulabrao Patil News Jalgaon
ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

तालुक्यातील एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच आमदार म्हणून मी ठरवला आणि गावातील लोकांनी आम्हाला हा माणूस नको सांगितले, तर आम्हाला देखील ऐकावे लागते, निर्णय बदलावा लागतो. तसेच आम्ही सांगितल्यावर नेत्यांनी ते ऐकले पाहिजे, हीच आमची अपेक्षा होती, असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com