बारा कोटींच्या गाडीत बसायला १२५ कोटी जनतेचे आशिर्वाद लागतात..

वडिलांच्या पुण्याईवर आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांना ते कळणार नाही. (Mla Atul Bhatkhalkar)
Mla Atul Bhatkhalkar-Sanjay Raut

Mla Atul Bhatkhalkar-Sanjay Raut

Sarkarnama

मुंबई ः शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ कोटींच्या बुलेप्रुफ मर्सिडीज कारवरून टीका केली आहे. (Pm Narendra Modi) १२ कोटींच्या गाडीतून फिरायचं आणि स्वतःला फकीर म्हणायचं, अस म्हणत राऊत (Sanjay Raut) यांनी मोदीवर निशाणा साधला, तसेच त्यांनी आता स्वतःला फकीर म्हणवून घेऊ नये, असा टोलाही लगावला.

संजय राऊत यांच्या या टीकेनंतर आता भाजपकडून देखील शिवसेनेवर (Shivsena) पलटवार केला जात आहे. भाजपचे (Bjp) आमदार आणि प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या ट्विटवर भाष्य करणारे ट्विट करत सुनावले आहे.

` १२ कोटींच्या त्या बुलेटप्रूफ गाडीत बसायला, पंतप्रधान निवासात मुक्काम करायला, अत्यंत सुरक्षित विमानाने फिरायला १२५ कोटी जनतेचे आशीर्वाद लागतात. वडिलांच्या पुण्याईवर आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांना ते कळणार नाही`, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी येणाऱ्या महागड्या मर्सिडीज कार वरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अत्याधुनिक आणि सर्व सुरक्षा यंत्रणांनी सज्ज अशा या गाडीची किमंत बारा कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

<div class="paragraphs"><p>Mla Atul Bhatkhalkar-Sanjay Raut</p></div>
एकनाथ शिंदे सक्षम, त्यांना मुख्यमंत्री करा, दानवे पुन्हा बोलले

नेमकं यावरूनच संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या एका जुन्या विधानाची आठवण करून देत टीका केली. `हम तो फकीर आदमी है, झोला उठा के चल देंगे`, या मोदींच्या विधानाची आठवण करून देत राऊत यांनी मोंदीना टोला लगावला होता. पण यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com