महाराष्ट्रातील बड्या साखर व्यापाऱ्यावर 'आयकर'ची धाड; मोठं घबाड हाती

Income tax raid : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई
income tax raid
income tax raidSarkarnama

सांगली : सांगली (Sangali) शहरातील एका बड्या आणि प्रसिद्ध साखर व्यापाऱ्यावर काल आयकर विभागाने धाड (Income tax raid) टाकत मोठी कारवाई केली आहे. संबंधित व्यापारी हा महाराष्ट्रातील अग्रगण्य साखर व्यापारी (Sugar Businessman) देखील समजला जातो. या धाडीत आयकरच्या अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या कागदपत्र हाती लागली आहेत. त्यासोबतच मोठी रक्कमचे घबाडही हाती लागल्याचे समजते आहे.

विशेष गोष्ट म्हणजे या व्यापाऱ्याकडे मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता गृहित धरुन आयकर विभागाने धाड टाकण्यासाठी सांगलीसह पुणे, कोल्हापूर आणि कर्नाटकातील पथकांनी पाचारण केले होते. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या व्यापाऱ्याच्या निवासस्थान, मार्केट यार्ड परिसरातील दुकानावर छापे टाकण्यात आले. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आयकर विभागाकडून याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.

income tax raid
चंद्रकांतदादांच्या खेळीला दिवंगत आमदाराच्या पत्नीचे प्रत्युत्तर; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

मात्र शहरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छापा टाकण्यात आलेला व्यक्ती सह्याद्रीनगर परिसरात वास्तव्यास आहे. काल आयकर विभागाची पथके सांगली शहरात दाखल झाली होती. तेव्हापासून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. यात आतापर्यंत आलिशान गाडी, मोठी रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत.

income tax raid
किरण माने प्रकरणात मोठी घडामोडी; चित्रीकरण थांबवण्याच्या आदेशाने वाद चिघळणार?

या कागपत्रांच्या आधारे सांगली मार्केट यार्ड परिसरातही छापे टाकण्यात आले. तसेच या व्यापाऱ्यासह अन्य काही ठिकाणाही छापे टाकण्यात आल्याचे समजते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in