अजितदादा अडचणीत ? निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू केली आहे. केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून कारवाईस सुरवात केली आहे.


अजितदादा अडचणीत ? निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी
ajit pawarsarkarnama

बारामती (पुणे) : भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी काल महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होते. त्यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू केली आहे. केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून कारवाईस सुरवात केली आहे.

बारामती तालुक्यातील काटेवाडी (katewadi) येथील एका व्यक्तीच्या घराची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ajit pawar
20 Years Of PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान, वाचा दहा उल्लेखनीय कामगिरींची नोंद

बारामतीत (baramati) काल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) येऊन गेल्यानंतर आज लगेचच छापेमारी सुरु झाल्यानंतर याला काही राजकीय संदर्भ आहेत किंवा कसे या चर्चेला उधाण आले आहे.एमआयडीसीतील एक कंपनीतही चैाकशी सुरु असल्याचे समजते. मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.

केंद्रीय यंत्रणांकडून गुरुवारी सकाळीच बारामती परिसरात शोधमोहिम सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. नेमकी ही शोधमोहिम कशासाठी सुरु आहे हेही निष्पन्न झालेले नाही. एका खासगी साखर कारखान्याशी संबंधित एका पदाधिका-याच्या घराबाहेरही हे अधिकारी ठाण मांडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी या बाबत नेमका खुलासा झालेला नाही.

Related Stories

No stories found.