Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक ढिसाळपणा; काँग्रेसचा आरोप

Maharashtra Congress : भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये तिरंगा फडविण्याचा निर्धार
Rahul Gandhi, Hanumant Pawar
Rahul Gandhi, Hanumant PawarSarkarnama

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo yatra) आता जम्मू काश्मीरमध्ये अंतिम टप्प्यात आहे. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचे आज समोर आले. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे.

या प्रकारामुळे राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेकडून नियोजित पदयात्रा काही अंतरावर थांबवली. केंद्र सरकार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेत जाणूनबुजून गंभीर त्रुटी ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

Rahul Gandhi, Hanumant Pawar
Rahul Gandhi : यात्रेत नेमकं काय घडलं, की राहुल गांधींना माघार घ्यावी लागली

आज बनिहाल (Banihal) येथून मोठ्या जनसमुदायासह भारत जोडो यात्रा सुरू झाली होती. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पोलिसांनी अचानक यात्रेतून काढता पाय घेतला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. त्यातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकारी आणि जवानांच्या स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचीं बेफिकीरी लक्षात आली. सुरक्षा यंत्रणेने राहुल गांधींना यात्रेत पुढे जाण्यापासून थांबवले. त्यानुसार राहुल गांधी यांनी आज यात्रा थांबवून सुरक्षीत ठिकाणी दाखल झाले. उद्या (शनिवारी) नियोजनानुसार राहुल गांधी पुन्हा भारत जोडोत सहभागी होणार आहेत.

Rahul Gandhi, Hanumant Pawar
Rahul Gandhi : पोलीस संरक्षणाअभावी राहुल गांधींनी काश्‍मीरमधील भारत जोडो यात्रा स्वत:पुरती थांबविली

जम्मू काश्मीरसह देशभरात भारत जोडो यात्रेला मिळणारा लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यातूनच शेवटच्या टप्प्यात काहीतरी कारण काढून यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज यात्रेतून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अचानक काढता पाय घेणे हे त्याचेच उदाहरण असल्याचा आरोपही हनुमंत पवार यांनी केला.

Rahul Gandhi, Hanumant Pawar
Amit Shaha News : अमित शाह दक्षिण दिग्विजयावर : काँग्रेस शह देणार का?

महागाई, बेरोजगारीने देशातील जनता त्रस्त आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते केंद्र सरकारला (Central Government) जाब विचारत आहेत. तसेच यात्रेला वाढता प्रतिसाद पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढत आहे. त्यातूनच जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेत गंभीर त्रुटी ठेवण्यात आल्या. हा हलगर्जीपणा का होतोय, याची चौकशी करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com