"मी ब्राह्मणांना या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितो" : रावसाहेब दानवे

Raosaheb Danave | : आधी वक्तव्य अन् त्यावर तात्काळ खुलासा
"मी ब्राह्मणांना या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितो" : रावसाहेब दानवे
Raosaheb DanveSarkarnama

जालना : मी ब्राह्मण व्यक्तींना केवळ फक्त नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदी नाही तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितो अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी दिली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजप (BJP) पुन्हा एकदा ब्राह्मण मुख्यमंत्री बसवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ते जालना शहरात परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना आगामी नगरपरिषद निवडणुकीत जालना शहरात ब्राह्मण समाजाच्या एका पेक्षा जास्त उमेदवारांना नगरसेवक पदी संधी द्या, अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या सुनील किंगावकर यांनी केली. यावर रावसाहेब दानवे म्हणाले, मी कोणा एका ब्राह्मण व्यक्तीला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदी पाहू इच्छित नाही तर त्यांना मी राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असे उत्तर किंगावकर यांना दिले. दानवेंच्या यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

Raosaheb Danve
सभेत राजन पाटलांचे कौतुक अन् प्रवासात उमेश पाटलांना सोबत : अजितदादांचा करेक्ट मेसेज!

मात्र या वक्तव्यावर दानवे यांनी तात्काळ खुलासा करत मागच्या निवडणुकीत एकाही ब्राह्मणाला तिकीट दिली नाही, असे माझ्या आधी भाषण केलेले किंगावकर म्हणाले होते. त्यावर मी बोललो असे ते म्हणाले.

शिवसेनेवर कडाडून टीका :

रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, हिंदुत्वापासून शिवसेना कोसो मैल दुर गेली आहे. हेच आमच्या शाळेत हिंदुत्व शिकले, आणि आता काय राज ठाकरेंना सांगतात यांचे शिक्षक वेगळे आहेत. शिवसेना ज्या शाळेत हिंदुत्व शिकली त्या शाळेचे हेडमास्तर आम्ही. शिवसेना तर आमचा विद्यार्थी आहे. पण ते जेव्हा आमची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेले तेव्हाच त्यांच्या आणि हिंदुत्वाचा संबंध संपला.

Raosaheb Danve
संदीप देशपांडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अटकेसाठी पोलिसांचा शोध सुरु

शिवाय बाबरी पडली तेव्हा दुर्बिनीने शोधला तरी शिवसैनिक दिसला नाही, अशीही टीका मंत्री दानवे यांनी केली. ते म्हणाले, बाबरी पडली तेव्हा मी स्वतः तेथे होतो. तेव्हा तिथं दुर्बिणीनं शोधूनही कोणता शिवसैनिक दिसला नाही. त्यामुळे तिथं उपस्थित असल्याचा शिवसेनेनं एक तरी पुरावा द्यावा, अशी मागणीही दानवे पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.