मराठी पाट्यांच्या निर्णयाला विरोध; गुणरत्न सदावर्तेंची राज्यपालांकडे धाव

Adv. Gunratna Sadavarte : न्यायालयात जाण्याचाही इशारा
मराठी पाट्यांच्या निर्णयाला विरोध; गुणरत्न सदावर्तेंची राज्यपालांकडे धाव
Gunratna Sadavarte Sarkarnama

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Government) काल पार पडलेल्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानुसार आता राज्यातील सर्वच्या सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत आणि मोठ्या अक्षरात असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मनसेने आणि इतर पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना पत्र लिहून आक्षेप व्यक्त केला असून निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच निर्णय रद्द न झाल्यास त्या विरोधात त्यांनी न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत बोलताना म्हटले की, दुकानांवरील पाट्या मराठीत आणि अक्षराची साईज पाटीवरील इतर अक्षराइतकीच असावी हा निर्णय म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम १९ चा भंग आहे. तसेच ट्रेडमार्क अँड लोगो या अधिकारावरसुद्धा गदा आणणारा आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मंत्रिमंडळाने किंवा महाराष्ट्र शासनाने सर्व सामान्यांची मते मागविणे अपेक्षित होते, परंतु कोणतीही मते न मागविता तसेच व्यापारी दुकांनांवर काय दुरगामी परिणाम होतील याचा विचार न करता हा निर्णय घेण्याता आला आहे. मुंबई शहर हे वैश्विक व्यापाराचे केंद्र आहे याचाही विसर पडल्याने केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याकरिता आणि राजकीय अभिलाषा पूर्ण करण्याकरिता हा चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Gunratna Sadavarte
चंद्रकांतदादांची नवी खेळी; दिवंगत आमदाराच्या पत्नीला भाजपकडून लढण्याची ऑफर

अॅड. सदावर्ते म्हणाले, राज्य सरकारचा हा निर्णय बालहट्टासारखा आहे. कारण मराठी लिपीतील दुकानावरील पाटी असावी असे म्हटले आहे, अन्यथा इतर भाषेत जी फॉन्ट साईझ असेल त्याच फॉन्ट साईझचे मराठीतही नाव असावे असे म्हटले आहे. मात्र सरकारने ट्रेडमार्क अँड लोगो सारख्या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा मराठी भाषेतील दुकानांवरील पाठ्यांचा फॉन्ट साईझ बाबतचा निर्णय रद्द करावा आणि त्या बाबतचे नोटिफिकेशन थांबवावे अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसेच राज्यपालांनी याबाबतचा निर्णय न घेतल्यास त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.

Gunratna Sadavarte
संतापजनक : गावातील टपोरी पोरांच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

राज्यातील सर्वच्या सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत असणे बंधनकारक करण्याचा काल निर्णय घेण्यात आला आहे. यापुर्वी देखील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in