आम्ही शांत आहोत, हतबल नाही ; सामंतांच्या हल्ल्यावर गुलाबरावांचा सूचक इशारा..

मंत्रीमंडळ विस्तार लवकर व्हावा, ही आमची देखील इच्छा आहे. कारण अनेक भागात पूर परिस्थिती होती, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. (Gulabrao Patil)
Ex.Minister Mla Gulabrao Patil News
Ex.Minister Mla Gulabrao Patil NewsSarkarnama

औरंगाबाद : उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्यात झालेला हल्ला हा निंदनीय आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. एखाद्या व्यक्तीचा विचार किंवा त्याने घेतलेला निर्णय तुम्हाला पटला नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर हल्ला करणार का? आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने निवडणूकीत तुम्ही याचा बदला घेऊ शकता, पण ते न करता गाडीवर हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. (Shivsena) यावर आम्ही अगदी शांतपणे विचार करतो आहे, पण याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा होत नाही, अशा शब्दात माजीमंत्री आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सूचक इशारा दिला.

माजीमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेतला असला तरी अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आमदार हे आक्रमक झाले आहेत. सत्तार यांनी आम्हीही रस्त्यावर उतरून हल्ले करू, असा इशारा दिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी देखील सूचक इशारा दिला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलतांना पाटील म्हणाले, उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा चुकीचा आणि लोकशाहीला लाजवणारा आहे. विचारांची लढाई ही अशा पद्धतीने बदला घेऊन लढली जात नसते. त्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणुकीत तुम्ही त्याला पराभूत करू शकता. सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही शांत आहोत, पण हतबल नाही. त्यामुळे हे प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत आणि या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.

Ex.Minister Mla Gulabrao Patil News
गेलात ना..आता शिंदेची तळी उचला ; आमच्या नेत्यांबद्दल बोललेलं सहन करणार नाही..

शिंदे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार लवकर व्हावा, ही आमची देखील इच्छा आहे. कारण अनेक भागात पूर परिस्थिती होती, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी मंत्रीमंडळ विस्तार होणे गरजेचे आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in