ST Strike : आझाद मैदानातील आंदोलनातून सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची माघार!
Sadabhau Khot,Gopichand Padalkarsarkarnama

ST Strike : आझाद मैदानातील आंदोलनातून सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची माघार!

यापुढे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही, याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे.

मुंबई : एसटी संपाबाबत आजची एक मोठी घडामोड समोर येत आहे. आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तुर्तास माघार घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी ही घोषणा केली आहे. तसेच यापुढे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही, बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे, याचा निर्णय कामगारांनी घ्यायाचा आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले आहे.

खोत म्हणाले, विलीनीकरणाची लढाई न्यायालयात आहे, पण तोपर्यंत काहीसा दिलासा म्हणून सरकारने दिलेली वाढ म्हणजे कामगारांचा पहिल्या टप्प्यातील विजय आहे. मूळ वेतनामध्ये वाढ झाली आहे, मागच्या अनेक दिवसांपासून ही वाढ झाली नव्हती. तसेच महामंडाळाला पगारासाठी कमी पडणारा निधी राज्य शासन देईल आणि १० तारखेच्या आत पगार देण्यास सरकार बांधिल राहिल अशी भूमिका घेतली आहे. सोबतच सरकारने निलंबन, बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचाही निर्णय घेतला आहे. गैरहजर असलेल्या दिवसांच्या पगार देण्याची सरकारची भूमिका सरकारने घेतली आहे असेही ते म्हणाले.

Sadabhau Khot,Gopichand Padalkar
"२६/११ हल्ल्यात परमबीर सिंगानी दहशतवाद्यांना मदत केली, कसाबचा मोबाईलही गायब"

सदाभाऊ खोत यांनी आता न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर विलीणीकरणाचा लढा सुरुच राहिल अशी भूमिका मांडत, कामगार जेव्हा केव्हा हाक मारतील तेव्हा उभे राहू असे अश्वासन देत तुर्तास आपण आझाद मैदान सोडणार असल्याचे घोषित केले. तसेच यापुढे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही, बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे, याचा निर्णय कामगारांनी घ्यायाचा आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले आहे.

Sadabhau Khot,Gopichand Padalkar
मी राष्ट्रीय राजकारणात, महाराष्ट्राचे नेतृत्व फडणवीसच करणार!

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी अभिनंदन करतो. कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत पहिल्यांदा संघटना बाजूला ठेवून आंदोलन केले. पण समितीचा अहवाल २० डिसेंबरला येणार आहे, २० डिसेंबरलाही निर्णय होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आंदोलनात जेवढे मिळते ते पदरात पाडून घ्यायचे आणि राहिल्यासाठी भांडायचे असते. आपण सगळ्यांनी मिळून सरकारला हेकेखोर पणा बाजूला ठेवून निर्णय घ्यायला लावला. सरकार दोन पावले पुढे आले आहे. आम्ही दोन्ही बाजूंचा विचार केला, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाची भूमिका आमची आजही आहे, पण आता मार्ग काढला पाहिजे. न्यायालयात विलीनीकरणचा मुद्दा प्रलंबित आहे. म्हणून सारासार विचार केला. आता संप कुणाला करायचं असेल तर आम्ही त्यांना थांबवणार कोण? आझाद मैदानावर आम्ही सांगितले आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. आम्ही आता जाणार नाही. आम्ही नांगे फकीर आहोत, राजकारणात हे होत राहते असे म्हणत पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतली.

Related Stories

No stories found.