चाकणकरांच्या उत्तराधिकारी ठरल्या! विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष

Vidya Chavan | NCP | Women Wing President : याशिवाय राज्यात पहिल्यांदाच महिला आघाडीच्या विभागवार अध्यक्षांची निवड
चाकणकरांच्या उत्तराधिकारी ठरल्या! विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष
Rupali chakankar - Vidya ChavanSarkarnama

मुंबई : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला (Women wing) प्रदेशाध्यक्षपदी आता माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान (Fouzia Khan) यांनी आज ही घोषणा केली आहे. याशिवाय राज्यात पहिल्यांदाच महिला आघाडीच्या विभागवार अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांच्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पद रिक्त होते, यावर आता माझी निवड झाली आहे. देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सर्व महिलांना सोबत घेवून यावर आम्ही सातत्याने आवाज उठवणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Rupali chakankar - Vidya Chavan
शिवसेनाची जागा आता मनसे घेणार? NDA विस्तारासाठी भाजपचा रोडमॅप ठरला!

याशिवाय राज्यात पहिल्यांदाच महिला आघाडीच्या विभागवार अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यात विदर्भातील नागपूर विभागासाठी शाहीन हकीम आणि अमरावती विभागासाठी वर्षा निकम यांची निवड करण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद - शादिया शेख, लातूर - वैशाली मोते यांची वर्णी लागली आहे.

Rupali chakankar - Vidya Chavan
संदीप देशपांडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अटकेसाठी पोलिसांचा शोध सुरु

पश्चिम महाराष्ट्रासाठी - कविता म्हेत्रे आणि पुणे विभाग - वैशाली नागवडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रासाठी अनिता परदेशी यांची नियुक्त करण्यात आळी आहे. कोकण विभागासाठी देखील २ अध्यक्ष असणार आहेत, असे फौजिया खान यांनी जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.