पाच मंत्री, 25 आमदारांना कोरोना; पंकजा मुंडे या ओमिक्राॅन `पाॅझिटिव्ह`

राज्यात ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असल्याने सरकारचे दक्षतेचे आदेश
 Pankaja Munde

Pankaja Munde

Sarkarnama 

मुंबई : राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही आज सौम्य लक्षणे आढळून आली. त्यांना ओमिक्राॅमची लक्षणे दिसू येत आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील घरीचं उपचार सुरू आहेत. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात बोलताना 10 मंत्री आणि 25 आमदारांना कोरोना झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यातील पाच नावे मिडियाला कळाली आहेत. इतर नावांबाबत अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार मंत्री वर्षा गायकवाड, के. सी. पडवी, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सागर मेघे, शेखऱ निकम, इंद्रनील नाईक, चंद्रकांत पाटील (जळगाव), माधुरी मिसाळ माजी आमदार दीपक सावंत, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाने गाठले आहे. त्यातील हर्षवर्धन पाटील हे ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. इतर नेत्यांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. यातील अनेक नेत्यांना विवाह सोहळ्यांस उपस्थित राहिल्याने संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन आटोपताच मंत्री, आमदार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. वेगवेगळ्या विभागांमधील सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक लोकांनी गेल्या तीन दिवसांत कोरोना चाचणी केल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय, मंत्र्यांचे बंगले, पक्ष कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या वाढल्या आहेत.


विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर गेल्या चार दिवसांत पाच मंत्री आणि जवळपास २५ आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. परिणामी, खबरदारी म्हणून बहुतांशी आमदार चाचणी करून घेत असल्याचे दिसत आहेत. अधिवेशन काळात पाच दिवस मंत्र्यांच्या संपर्कात असलेले अधिकारी, कर्मचारीही धास्तावले होते. त्यातून सर्वजण चाचणी करून कोरोना झाला आहे का, याची खातरजमा करीत आहे. ज्यांच्या मंत्र्यांना कोरोना झाला आहे; त्यांच्या सपंर्कातील काहीजण घरीच विलगीकरणात आहेत.त्यातील शंभरहून अधिक जणांना या आजाराची लागण झाल्याचे सांगण्यात आले. तरीही, पुढील काही दिवस काळजी म्हणून अधिवेशनात कामकाजात असलेल्यांनी विलगीकरणात राहण्याची सूचना वरिष्ठांनी केल्याचे समजते.

<div class="paragraphs"><p> Pankaja Munde</p></div>
चिंता वाढली: राज्यात आज दिवसभरात आढळले ८ हजार कोरोना रुग्ण

वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
मंत्री, आमदारांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यांना संसर्गाचा धोका असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर मंत्री, आमदारांच्या थेट सपंर्कातील चालकांची प्राधान्याने चाचणी करण्यात येत आहे. या घटकाची संख्या मोठी असून, त्यामुळे कोरोना पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com