राज ठाकरेंच्या नावाने खंडणीची मागणी, पोलीसांकडून सिनेसृष्टीतील तिघांना बेड्या

पोलीसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला (Marathi actor) देखील नोटीस पाठवली आहे.
Raj Thakre,MNS
Raj Thakre,MNSSarkarnama

मुंबई : राज ठाकरेंना (Raj Thackeray) ओळखत नाहीस? असे म्हणत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागितल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. याच प्रकरणी सध्या मुंबईतील मालवणी पोलीसांकडून सिनेसृष्टीतील तिघांना बेड्या घालण्यात आल्या आहेत. यात दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलणकर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. तसेच पोलीसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस पाठवली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.

संशयीत आरोपींनी मड परिसरातील एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत सुरक्षारक्षक १५ ऑक्टोबर रोजी मालवणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. त्याच्या तक्रारीवरुन भारतीय दंड विधान कलम ४५२, ३८५, ३२३, ५०४, ५३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे आणि एका महिलेला हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करता असताना ती त्याला "राजसाहेबांना ओळखत नाही का? मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही का? काम कोणासाठी करत आहेस?" असे प्रश्न विचारताना दिसत आहे. व्हिडिओत आलेल्या उल्लेखावरुन या महिलेचे नाव दिपाली असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in