माजी मंत्री अनिल बोंडेंनी अमरावतीतील दंगल घडवली : मलिक यांचा गंभीर आरोप

अमरावती (Amravati Riot) येथे दंगलीसाठी भाजपने पैसे पाठविल्याचा गौप्यस्फोट
Amravati
Amravati Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार आरोप करत अमरावती शहरातील दंगल ही माजी मंत्री अनिल बोंडे आणि त्यांच्या साथीदारांनी पेटविली, असा घणाघात केला. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही, असा दावा त्यांनी केला.

अमरावती येथे नियोजन पद्धतीने शहरात दंगल भडकवली गेली. याची चौकशी पोलिस करत आहेत. मुंबईतून पैसे पाठविण्यात आले असा आरोपही नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मोर्चा काढण्यासाठी भाजप नेत्यांनी परवानगी मागितली आणि भाजपने दंगल घडविली. त्यासाठी मुंबईतून पैसे पाठविण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.

Amravati
अमरावती पोलिस आयुक्तांनी शहरात लागू केली संचारबंदी...

मालेगावमधील दंगलीत राष्ट्रवादीचा हात असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. त्यांच्या म्हणण्यानुसार वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे काही ठिकाणी बंद पुकारला गेला. ज्याला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेकही झाली. अशा सर्व लोकांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मालेगावमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये देखील अशीच अप्रिय घटना घडली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र त्यात तथ्य नाही. मुफ्ती ईस्माईल यांनी काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर मुफ्ती ईस्माईल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक देखील गेले होते. त्यामुळे नगरसेवक हे कागदोपत्री राष्ट्रवादीचे असले तरी ते एमआयएममध्ये गेलेले आहेत असा खुलासाही नवाब मलिक यांनी केला.

Amravati
अमरावती : नमुना गल्लीमध्ये एका गटाने काढली शस्त्र, तर दुसऱ्या गटाची दगडफेक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात येऊन सांगतात की, महाराष्ट्राच्या सरकारला उखडून टाकू. मात्र सरकारे अशी उखडली किंवा बसवली जात नाहीत. केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून धमकावले जाते. बंगालमध्ये हे दिसले. नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये घेतले गेले. मात्र जेव्हा तृणमूलचे सरकार आले तेव्हा त्याच नेत्यांनी पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश केला. भाजपला हे समजायला हवे की, तुम्ही पैसे आणि केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून सरकारे उखडू शकत नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

महाराष्ट्राच्या सरकारमधील तीन पक्ष्यांचे चुंबक लक्ष्मी नाही, असे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा हे महाविकास आघाडी सरकारचे चुंबक आहे, अशा शब्दांत मलिक यांनी उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in