Sumant Ruikar

Sumant Ruikar

sarkarnama

रुईकर कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेनेनं घेतली!

रुईकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली होती.

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर, त्यांना दीर्घायुष्य लाभावे. यासाठी बीडमधून तिरुपतीला पायी यात्रा प्रवास करणारे शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांचे शनिवारी निधन झाले आहे. बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाऊन साकडे घालण्याचा सुमंत रुईकर यांचा नवस होता.

तिरुपती पायी यात्रा प्रवास चालू असताना त्यांना दोन-तीन दिवस ताप होता, त्यादरम्यान त्यांना कर्नाटक राज्यातील रायचूर येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी या कट्टर शिवसैनिकांची प्राणज्योत मालवली. सुमंत रुईकर आणि त्यांचे सहकारी श्रीधर जाधव यांनी 1 डिसेंबर रोजी बीडमधून तिरुपतीला पायी यात्रा प्रवास सुरु केला होता. रुईकर यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रुईकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली होती.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांच्या कुटंबाची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून येणार असल्याचं म्हटलं आहे. शिंदे यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे.

''या कट्टर शिवसैनिकाने मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही यात्रा चालू केली होती.त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे.रुईकर यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत आहे.त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही,'' असे टि्वट शिंदे यांनी केले आहे.

<div class="paragraphs"><p>Sumant Ruikar</p></div>
नीतेश राणेंच्या अटकेसाठी 'फिल्डींग'; सातपुतेला दिल्लीत अटक

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही रुईकर यांनी तिरुपतीची पायी यात्रा केली होती. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याने बीडचे शिवसैनिक सुमंत रुईकर व श्रीधर जाधव यांनी केलेला नवस फेडण्यासाठी बीड ते तिरुपती हे 1080 किलोमिटर अंतर पायी चालून पार करुन दर्शन घेतले होते. सुमंत रुईकर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. मागच्या वेळी त्यांच्या पत्नी बीड नगर पालिकेच्या नगरसेविका होत्या.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सुमंत रूईकर यांच्या परिवाला मदत केली आहे. नार्वेकर यांनी टि्वट करून मदत दिल्याची माहिती दिली. ''सुमंत रुईकर यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना 50 हजार रुपयांची मदत पाठवत आहे तसेच आवश्यक ते सहाय्य तत्परतेने करत आहोत,'' असं मिलिंद नार्वेकरांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com