Teacher Recruitment : पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार; केसरकरांची मोठी घोषणा

Deepak Kesarkar News: शंभर टक्के शिक्षक भरती होणार...
Deepak Kesarkar News,Teacher Recruitment
Deepak Kesarkar News,Teacher RecruitmentSarkarnama

Mumbai : राज्यातील जवळपास अडीच लाख उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून भरतीबाबत संकेत दिल्यानंतरही पवित्र पोर्टलवर कोणत्याही हालचाली होत नसल्यानं उमेदवारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. राज्यातील शिक्षक भरती कधी होणार असा सवाल उपस्थित करुन सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे.

दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकभरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Deepak Kesarkar News,Teacher Recruitment
Rajasthan Politics: 'गेहलोत यांच्या नेत्या सोनिया गांधी नाही तर वसुंधरा राजे'; आपल्याच सरकारविरोधात पायलट काढणार मोर्चा..

शंभर टक्के शिक्षक भरती होणार...

शिक्षक भरती(Teacher Recruitment) संदर्भात दीपक केसरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. मात्र, विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे असंही केसरकर म्हणाले.

आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही,मात्र..

माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करणार असल्याचं केसरकर यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल का याचा विचार आम्ही करत आहोत असेही केसरकर म्हणअसं केसरकर यांनी म्हटलं.शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

Deepak Kesarkar News,Teacher Recruitment
Mla Meghna Bordikar News : लंडनमधील भारतीयांकडून आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर...

गणवेशाबाबत लवकरच निर्णय...

विद्यार्थ्यांच्या एकच गणवेशाबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवलं जाईल असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com