शिवसेना अडचणीत ; खासदार भावना गवळी यांना ईडीचं पुन्हा समन्स

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. . या समन्सला भावना गवळी कसा प्रतिसाद देतात, याकडं आता लक्ष लागलं आहे.
 Bhavana Gawali
Bhavana Gawalisarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावल्या असून आज (ता.२०) त्यांना ईडीनं (ED) चौकशीसाठी बोलावलं आहे. शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. यापूर्वी गवळी यांना ईडीने ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळी त्यांनी १४ दिवसांचा कालावधी मागितला होता. हा कालावधी काल संपला आहे. ED Summons Shiv Sena MP Bhavana Gawali

गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने अटक केली होती. ट्रस्टला कंपनीत रूपांतर केल्याप्रकरणी ईडी गवळी यांची चौकशी करणार आहे. भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले आहेत. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीनं अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. तेव्हापासून ईडीच्या कारवाईला वेग आला आहे. या समन्सला भावना गवळी कसा प्रतिसाद देतात, याकडं आता लक्ष लागलं आहे.

 Bhavana Gawali
Unlock : राजेश टोपे म्हणाले, ''दिवाळीनंतर कुठेही फिरा'

ईडीने याप्रकरणी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, गवळी यांनी सईद खान व इतर साथीदारांच्या मदतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनी कायदा कलम ८ च्या अंतर्गत कंपनीत रूपांतरित केले. त्यात खोट्या कागदपत्रांचा वापर झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीच्या तपासानुसार याप्रकरणात बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाला. त्या माध्यमातून ट्रस्टमधील ६९ कोटी रुपयांची मालमत्ता कंपनीत हस्तांतरित करण्यात आली. ३ जानेवारी २०२० मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली. त्यातील एक संचालक सईद खान होता.

याप्रकरणी ईडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे ऑडिटर उपेंद्र मुळ्ये यांचाही जबाब नोंदवला आहे. त्यात ट्रस्टमधून सात कोटी रुपये काढण्यात आल्याचेही म्हटले आहे. सईद यांच्या अटकेपूर्वी

ईडीने याप्रकरणी रिसोड येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, रिसोड येथील अर्बन कॉ. क्रेडिट सोसायटी, सीए हकीम शेख यांचे कार्यालय, नागपूर येथील सीएस मोहम्मद अथर यांचे कार्यालय, औरंगाबाद येथील उपेंद्र मुळ्ये यांचे घर, परभणी येथील सईद खानचे घर येथे शोधमोहीम राबवली होती. त्या वेळी महत्त्वपूर्ण कागदपत्र ईडीच्या हाती लागली होती. ईडी याप्रकरणी १८ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार व सात कोटी रुपयांची चोरी याचा तपास सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com